NMMC Recruitment Selection Procedure: नवी मुंबई महानगरपालिकाने विविध पदासांठी अर्ज मागिवले आहेत. आरोग्य विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांच्या एकूण ११० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे. येत्या ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
वैद्यकीय अधिकारी- वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस असावा, लक्षात घ्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी अनिवार्य आहे. तसेच सरकारी/खाजगी क्षेत्रातील संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
स्टाफ नर्स- स्टाफ नर्सपदासाठी उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ डिप्लोमा किंवा बी.एससी. नर्सिंग झालेला असावा, स्टाफ नर्स पदासाठी महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी अनिवार्य आहे.
वैद्यकीय अधिकारी- ७० वर्षे
स्टाफ नर्स- (खुला प्रवर्ग ३८ वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे)
या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. मुलाखत वर दिलेल्या पत्त्यावर होणार आहे. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात व्यवस्थित पाहावी.
मुलाखतीची तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ आहे. उमेदवारांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४ या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
संबंधित बातम्या