मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bihar Politics : नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; कारणही सांगितलं!

Bihar Politics : नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; कारणही सांगितलं!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 28, 2024 12:09 PM IST

Nitish Kumar Resignation News : भाजपसोबत राजकीय डील पक्की झाल्यानंतर नितीश कुमार यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Nitish Kumar
Nitish Kumar

Nitish Kumar and Bihar Politics : लोकांना धक्का बसणंही बंद व्हावं इतके अनपेक्षित व अनाकलनीय निर्णय घेणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी अखेर बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय जनता दल व इंडिया आघाडीची साथ सोडून ते आता भाजपसोबत राजकीय संसार थाटणार आहे. ते आजच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून लालू यादव, तेजस्वी यादव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर नितीश कुमार यांनी पडद्यामागे भाजपशी गुफ्तगू सुरू केलं होतं. कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर नितीश यांनी मोदींचे आभार मानले आणि नितीश यांच्या नव्या चालीवर शिक्कामोर्तब झालं होतं. त्यानुसारच आज नितीश यांनी राजीनामा दिला.

Viral Video : भाजपसोबत जाण्यापेक्षा मरणं पसंत करेन... नितीश कुमार यांचा जुना व्हिडिओ व्हायरल

राजीनामा देऊन राजभवनातून परतताना नितीश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी राष्ट्रीय जनता दल व यादव पितापुत्रावर तोफ डागली. 'मला कामच करू दिलं जात नव्हतं, असं ते म्हणाले.

काय म्हणाले नितीश कुमार?

'मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बिहारमधील मंत्रिमंडळ आता बरखास्त झालं आहे. आम्ही नवी आघाडी स्थापन केली होती. मात्र, त्यांची स्थिती चांगली दिसत नाही. त्यामुळं आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं नितीश कुमार म्हणाले.

‘आरजेडीसोबत काम करताना खूप त्रास होता होता. मी भरपूर काम करण्याचा प्रयत्न करत होतो. कुठलंही काम केलं की त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न व्हायचा. सरकारी नोकर भरती असो, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा विषय असो किंवा जातीनिहाय जनगणना असो. प्रत्येक निर्णयाचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला जायचा. त्यामुळं मी अस्वस्थ होतो. बरेच दिवस सहन केलं. काही बोलत नव्हतो. शांत होतो,’ अशा शब्दांत नितीश यांनी आपली बाजू मांडली.

शिवरायांशी तुलना व्हावी असं कोणतं अचाट काम मोदींनी केलं?; संजय राऊत यांचा रोकडा सवाल

'मी पक्षातील सर्व लोकांशी चर्चा करून, त्यांची मतं जाणून घेऊन राजीनामा दिला आहे. आता नव्या मित्रांच्या सोबत जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढील सरकारबाबत किंवा मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतंही भाष्य करणं त्यांनी टाळलं.

WhatsApp channel

विभाग