Nitish Kumar And PM Modi Viral Video: नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहारमधील राजगीर येथे हजेरी लावली. मोदींसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. मात्र, उद्घाटन समारंभादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार हे मोदींचा हात धरून काहीतरी पाहू लागले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया कॅम्पसच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करत असताना ही घटना घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
व्हायरल व्हिडिओमध्ये नितीश कुमार मोदींच्या डाव्या हाताचे बोट धरून त्यावरील शाईकडे पाहत असल्याचे दिसत आहे. नितीश कुमारने हात धरल्यानंतर स्वत: मोदींना देखील आश्चर्यचकीत वाटते. इतकंच नाही तर मागे बसलेले सुरक्षा कर्मचारीही हे पाहून हैराण होतात. यानंतर नितीश कुमार यांनीही पीएम मोदींकडे बोट दाखवतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नितीश कुमार आणि मोदी यांच्यात काहीतरी चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
मोदींनी नालंदा विद्यापीठाच्या ४५५ एकर परिसराचे उद्घाटन केले. देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्याचे मोदींनी सांगितले. "पुस्तके जरी जाळली तरी ज्ञान जाळता येत नाही. मला शपथ घेतल्यानंतर 10 दिवसांत नालंदाला जाण्याची संधी मिळाली आहे. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. देशाच्या विकासासाठी हे एक चांगले लक्षण म्हणूनही मी पाहतो", असेही मोदी म्हणाले.
नालंदा विद्यापीठाची स्थापना त्याच जागेवर झाली आहे, जिथे प्राचीन काळी विद्यापीठ होते. या नव्याने बांधण्यात आलेल्या केंद्रीय विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दोन शैक्षणिक ब्लॉक असतील. सुमारे १९०० विद्यार्थ्यांसाठी ४० वर्गखोल्या आणि बसण्याची व्यवस्था असेल. याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, सभागृह आदींचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या विद्यापीठाची वीज यंत्रणा सौर यंत्रणेवर आधारित आहे.
संबंधित बातम्या