मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘NDA मधील चार घटक पक्ष I.N.D.I.A. आघाडीत सामील होणार, काँग्रेस व नितीश कुमारांचा मोठा दावा

‘NDA मधील चार घटक पक्ष I.N.D.I.A. आघाडीत सामील होणार, काँग्रेस व नितीश कुमारांचा मोठा दावा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 27, 2023 08:14 PM IST

India Alliance : एनडीए मधील चार घटक पक्ष हे निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये सामील होणार असल्याचादावा काँग्रेस तसेच नितीश कुमार यांनी केला आहे.

india alliance
india alliance

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी I.N.D.I.A आघाडीबाबत मोठा दावा केला आहे. नितीश कुमार यांनी म्हटले की, मुंबईतील होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी आणखी काही राजकीय पक्ष आघाडीत सामील होणार आहेत. नितीश कुमार यांनी भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.  त्यांनी नव्याने सामील होणाऱ्या पक्षांची नावे जाहीर केली नाहीत. मात्र त्यांनी सांगितले की, जागा वाटपासारख्या निवडणूक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा केली जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुंबईत होणाऱ्या आगामी बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर I.N.D.I.Aआघाडीच्या रणनितीवर चर्चा केली जाईल.जागा वाटप व अन्य मुद्यांवर चर्चा केली जाईल. आणखी काही पक्ष आघाडीत सामील होत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अधिकाधिक पक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

काँग्रेसकडूनही मोठा दावा -

एनडीए मधील चार घटक पक्ष हे निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये सामील होणार असल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा यांनी नागपुरात केला आहे. अमेठीच्या जागेवर काँग्रेसचा ब्लॉक अध्यक्षही निवडणूक लढला तर स्मृती इराणी यांचं डिपॉझिट जप्त होईल, असंही आलोक शर्मा म्हणाले. एनडीए आघाडीची कुठलीच बैठक गेल्या अनेक वर्षांपासून झाली नव्हती. पण इंडिया आघाडी स्थापन झाल्यानतर एनडीएने बैठक घेतली.

 

देशातील विरोधी पक्ष आणि लोक जे इंडियासोबत आहे. तसेच एनडीएतील चार घटक पक्ष हे निवडणुकीपूर्वी इंडिया सोबत सहभागी होतील, असाही दावा आलोक शर्मा यांनी केला. ते नागपुरात रविभवन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र त्यांनी चार घटक पक्षाचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.

WhatsApp channel

विभाग