मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nitish Kumar: नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले नितीश कुमार, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची उपमुख्यमंत्रीपदी शपथ

Nitish Kumar: नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले नितीश कुमार, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची उपमुख्यमंत्रीपदी शपथ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 28, 2024 06:21 PM IST

Nitish Kumar Take Oath bihar CM : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नवव्यांदा शपथ घेतली आहे. भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Nitish Kumar Take Oath bihar CM
Nitish Kumar Take Oath bihar CM

Bihar Political Crisis News: बिहारमधील राजकीय उलथापालथी दरम्यान नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नवव्यांदा शपथ घेतली आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी (BJP) चे बिहार प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी (Samrat Choudhary) आणि पक्षाचे वरिष्ठ नेते विजय सिन्हा (Vijay Sinha) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत एकूण ८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यामध्ये जेडीयू व भाजपचे प्रत्येकी ३-३ आमदारांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. 

शपथ घेतलेल्या मंत्र्यांची यादी -

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याबरोबर भाजपचे सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, JDU  चे विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, बीजेपीचे प्रेम कुमार, जेडीयूचे श्रवण कुमार, हम (जीतन मांझी यांचा पक्ष) पक्षाचे संतोष कुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

जनता दल-यूनाइटेड (JDU) चे अध्यक्ष नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी म्हटले की, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव अलायंस’ (I.N.D.I.A.) आणि राजदसोबतची आघाडी ठीक वाटत नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जात नवीन सरकार बनवण्याचा निर्णय घेतला. नितीश यांनी १८ महिन्यापूर्वी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएची साथ सोडत राजदबरोबर सरकार स्थापन केले होते. 

नितीश कुमार ऑगस्ट २०२२ मध्ये महाआघाडीत सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी जेडीयू तोडण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपवर केला होता. 

सध्याच्या २४३ सदस्यीय बिहार विधानसभेत JDU चे ४५ आणि भाजपचे ७८ आमदार आहेत.  नितीश कुमार यांना एका अपक्ष आमदाराचे समर्थन मिळाले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वातील हिंदुस्तानी अवाम मोर्चा आधीपासूनच NDA चा भाग असून त्या पक्षाचे चार आमदार आहे.

WhatsApp channel