गरीब कुटूंबातील मुलींच्या विवाहास सरकार करणार मदत, काय आहे 'कन्या विवाह मंडप' योजना?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गरीब कुटूंबातील मुलींच्या विवाहास सरकार करणार मदत, काय आहे 'कन्या विवाह मंडप' योजना?

गरीब कुटूंबातील मुलींच्या विवाहास सरकार करणार मदत, काय आहे 'कन्या विवाह मंडप' योजना?

Updated Mar 03, 2025 07:09 PM IST

गरीब मुलींच्या लग्नासाठी राज्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये मंडप उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सम्राट चौधरी यांनी दिली. तसेच लग्नविषयक सुविधा अत्यंत कमी शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जे चालवण्याची जबाबदारीही महिलांच्याच हातात असेल.

कन्या विवाह मंडप योजना
कन्या विवाह मंडप योजना

नितीश सरकार गरीब मुलींना लग्नात मदत करेल. लग्नविषयक सुविधा अत्यंत कमी खर्चात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये कन्या विवाह मंडप उभारण्यात येणार आहे. ज्याचे संचालनही महिलाच करणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सम्राट चौधरी यांनी सोमवारी २०२५-२६ साठी ३,१६,८९५ कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. ज्यात निम्म्या लोकसंख्येसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. ज्यात कन्या विवाह मंडप योजनेचाही समावेश आहे, जी गरीब कुटुंबांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

सम्राट चौधरी म्हणाले की, गरीब मुलींच्या लग्नासाठी राज्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये मंडप बांधण्यात येणार आहेत. तसेच लग्नविषयक सुविधा अत्यंत कमी शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जे चालवण्याची जबाबदारीही महिलांच्याच हातात असेल. यामुळे गरीब कुटुंबावरलग्नाचा खर्च अर्ध्यावर येणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पात हिला हाट, जिम, टॉयलेट आणि पिंक बस चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महिलांसाठी पिंक बस चालविण्यात येणार आहेत. प्रवासी, ड्रायव्हर आणि कंडक्टर या सर्व महिला असतील. बिहार राज्य मार्ग परिवहन महामंडळ (बीएसआरटीसी) चालक, वाहक आणि आगार देखभाल कर्मचारी या पदांवर महिलांना ३३ टक्के आरक्षण देणार आहे. याशिवाय स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी महिला चालकांना व्यावसायिक कामकाजासाठी ई-रिक्षा व दुचाकी खरेदीसाठी रोख अनुदानाची तरतूद करण्यात येणार आहे. शहरांमध्ये ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

सरकारने शिक्षणावर ६० हजार ९६४ कोटी तर आरोग्यावर २० हजार ३३५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून ५२ घोषणा करण्यात आल्या आहेत.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर