NIT Recruitment: परीक्षा न देता मिळवा नोकरी, एनआयटीमध्ये 'या' पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NIT Recruitment: परीक्षा न देता मिळवा नोकरी, एनआयटीमध्ये 'या' पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख!

NIT Recruitment: परीक्षा न देता मिळवा नोकरी, एनआयटीमध्ये 'या' पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख!

Published Oct 24, 2024 02:29 PM IST

NIT Recruitment 2024: एनआयटीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून येथे नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

NIT Jalandhar Faculty Recruitment 2024: Apply for 132 posts, details here
NIT Jalandhar Faculty Recruitment 2024: Apply for 132 posts, details here

NIT Jalandhar Faculty Recruitment 2024: एनआयटीमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. डॉ. बी. आर आंबेडकर राष्ट्रीय प्रोद्योगिकी संस्थान येथे फॅकल्टी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एनआयटी जालंधर येथे प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार एनआयटी जालंधरच्या अधिकृत वेबसाइटवरून nitj.ac.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील १३२ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत सहायक प्राध्यापक ग्रेड-२ (६९ जागा), सहायक प्राध्यापक ग्रेड- १ (२६ जागा), असोसिएट प्रोफेसर (३१- जागा) आणि प्रोफेसर (जागा- ६) पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यानंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे एनआयटीकडून स्पष्ट करण्यात आले.

वयोमर्यादा आणि अर्ज कुठे पाठवायचा?

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयमर्यादा ६० वर्ष असावी. उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी सर्व विहित सहाय्यक स्वयंप्रमाणित कागदपत्रांसह निबंधक कार्यालय, डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पोरेक कॅम्पस, जालंधर, पंजाब या पत्त्यावर पाठवावी.

परदेशी उमेदवारांना हार्ड कॉपी जमा करण्यापासून सूट

परदेशी उमेदवारांना हार्ड कॉपी जमा करण्यापासून सूट देण्यात आली आहे. मात्र, हार्ड कॉपी सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी recruitmentfaculty2024@gmail.com आणि dfw@nitj.ac.in येथे सर्व कागदपत्रे एकाच पीडीएफ फाईलमध्ये पाठविणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवारीचा विचार केला जाणार नाही.

महत्त्वाची माहिती

ही एक रोलिंग जाहिरात आहे. भरतीच्या पुढील फेरीसाठी संभाव्य अर्जदार या जाहिरातीच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज सादर करू शकतात. ही रोलिंग जाहिरात असल्याने उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी एनआयटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

 

डीआरडीओने अप्रेंटिस पदांची भरती

डीआरडीओने अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली. पात्र उमेदवार डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत अप्रेंटिसची विविध पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर