Nirmala Sitharaman Saree: पुन्हा निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं संपूर्ण देशाचं लक्ष, अर्थसंकल्पाआधी फोटो व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nirmala Sitharaman Saree: पुन्हा निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं संपूर्ण देशाचं लक्ष, अर्थसंकल्पाआधी फोटो व्हायरल!

Nirmala Sitharaman Saree: पुन्हा निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं संपूर्ण देशाचं लक्ष, अर्थसंकल्पाआधी फोटो व्हायरल!

Feb 01, 2025 10:48 AM IST

Nirmala Sitharaman Budget Day Saree: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पेहरावाची खूप चर्चा असते. त्या अर्थसंकल्पाच्या दिवशी विशेष साडी नेसतात. आजही त्यांनी नेसलेल्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अर्थसंकल्प २०२५: यंदाही निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं संपूर्ण देशाचं लक्ष
अर्थसंकल्प २०२५: यंदाही निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं संपूर्ण देशाचं लक्ष (Bloomberg)

Nirmala Sitharaman Saree on Budget Day:  अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी त्यांच्या पेहरावाची खूप चर्चा असते. निर्मला सीतारामन यांची साडी आतापर्यंत ७ वेळा अर्थसंकल्पाच्या दिवशी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. यंदाही अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी खास प्रकारची साडी नेसली आहे, जिने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आतापर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्यांनी इतक्या वेळा अर्थसंकल्प सादर केला नाही. आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याआधी निर्मला सीतारामन यांनी आपल्या संपूर्ण बजेट टीमसोबत औपचारिक फोटोसेशन केले. यावेळी निर्मला सीतारामन यांनी पारंपारिक क्रीम रंगाची मधुबनी मोटिफ साडी परिधान केली आहे. मिथिलाची चित्रे साडीत तयार करण्यात आली आहेत. ही साडी अर्थमंत्र्यांनी गडद लाल रंगाच्या ब्लाऊजसोबत नेसली आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मुधाबनी पेंटिंगची साडी सौरथ मिथिला पेंटिंग इन्स्टिट्यूटमध्ये मिळाली.  पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी हे भेट म्हणून दिली होती. जनता दल युनायटेडचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी ही माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा मिथिला पेंटिंग इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच अ‍ॅक्टिव्हिटीसाठी मधुबनी येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली आणि बिहारमधील मधुबनी कलेवर त्यांच्याशी सौहार्दपूर्ण विचारांची देवाणघेवाण केली. त्यावेळी दुलारी देवी यांनी अर्थमंत्र्यांना साडी भेट दिली आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करण्यास सांगितले.

दुलारी देवी वित्त मंत्री निर्मला सीतारमण को साड़ी भेंट करती हुईं
दुलारी देवी वित्त मंत्री निर्मला सीतारमण को साड़ी भेंट करती हुईं

निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या साडीला विशेष महत्त्व

निर्मला सीतारामन यांची मधुबनी पेंटिंग साडी ही मिथिलाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व आहे. मधुबनी कला ही बिहारच्या मिथिला प्रदेशातील एक पारंपारिक लोककला आहे. मधुबनी मोटिफ असलेली साडी परिधान करून निर्मला केवळ फॅशन स्टेटमेंटच देत नाहीतर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करत आहे आणि या पारंपारिक कला प्रकाराला जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांना आधार देत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच बिहारच्या मधुबनी जिल्ह्याचा दौरा केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बिहारमधील मधुबनी येथे एका कार्यक्रमात पोहोचल्या. जिथे त्यांचे स्वागत मखान्याचा हार घालून करण्यात आले. येथे त्यांना बिहारच्या मिथिलाच्या परंपरेची ही जाणीव करून देण्यात आली आणि निरोपाच्या वेळी खोईंचा देखील देण्यात आला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर