Union Budget : भारतात बनणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स; अर्थमंत्र्यांची 'ती' घोषणा ठरणार गेमचेंजर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Union Budget : भारतात बनणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स; अर्थमंत्र्यांची 'ती' घोषणा ठरणार गेमचेंजर

Union Budget : भारतात बनणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स; अर्थमंत्र्यांची 'ती' घोषणा ठरणार गेमचेंजर

Updated Feb 01, 2023 05:19 PM IST

Smartphone in Union Budget 2023 : स्मार्टफोन तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे.

Smartphone in Union Budget 2023
Smartphone in Union Budget 2023 (HT)

Union Finance Minister Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे. पायाभूत सुविधा आणि रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारनं मोठी घोषणा केली असून महिला, शेतकरी आणि आदिवासींसाठी बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची भारतात निर्मिती करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. त्यामुळं आता स्मार्टफोन निर्मितीच्या बाबतीत चीन आणि अमेरिकेच्या स्पर्धेत भारत उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, देशात स्मार्टफोन्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. स्मार्टफोन्सच्या परकीय गुंतवणुकीसाठी आणि उत्पादनासाठी आयात शूल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कॅमेरा लेन्स, बॅटरीसाठी आवश्यक असणारे लिथियम आणि स्मार्टफोन्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीवरील आयातशूल्कात कपात करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत केली आहे. त्यामुळं आता देशातील अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आयफोनच्याही किंमती होणार कमी?

स्मार्टफोन बाजारातील सर्वात प्रसिद्ध कंपनी आयफोनचं सर्वात जास्त उत्पादन हे चीन आणि अमेरिकेत केलं जातं. परंतु कोरोना महामारीच्या काळात चीनला मोठा आर्थिक फटका बसल्यामुळं आयफोन कंपनीनं कंपनीचं सेटअप दुसऱ्या देशात हलवण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळं आता मोदी सरकार स्मार्टफोन कंपन्यांना आयातशूल्कातील कपात आणि करसवलत देणार असेल तर अनेक कंपन्या भारतात स्मार्टफोन्सची निर्मिती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर