Nimisha Priya : येमेनच्या राष्ट्रपतींकडून केरळच्या निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा कायम; काय आहे प्रकरण?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nimisha Priya : येमेनच्या राष्ट्रपतींकडून केरळच्या निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा कायम; काय आहे प्रकरण?

Nimisha Priya : येमेनच्या राष्ट्रपतींकडून केरळच्या निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा कायम; काय आहे प्रकरण?

Dec 31, 2024 11:16 PM IST

Nimisha Priya in Yemen: येमेनमध्ये कामाला गेलेल्या निमिषा प्रिया या भारतीय नर्सच्या मदतीसाठी भारत सरकार पुढे आले आहे. निमिषा आणि तिच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. येमेनमध्ये निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निमिषा प्रिया
निमिषा प्रिया

Nimisha Priya in Yemen : येमेनमधील तुरुंगात गेल्या ७ वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या केरळमधील निमिषा प्रिया यांची दया याचिका येमेनचे राष्ट्रपती राशद अल अलीमी यांनी फेटाळून लावत तिच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. २०१७ पासून निमिषा प्रिया येमेनच्या तुरुंगात बंद आहेत. येत्या महिनाभरात तिला फाशी दिली जाण्याची शक्यता आहे.

येमेनचे राष्ट्रपती राशद अल अमीनी यांनी निमिषा प्रियाची दया याचिका फेटाळून लावत तिची फाशी कायम ठेवल्यानंतर भारत सरकार तिच्या मदतीसाठी पुढं सरसावलं आहे.

येमेनमध्ये कामाला गेलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रियाला खुनाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी या शिक्षेला मंजुरी दिली आहे. यानंतर आता भारत सरकार निमिषाच्या मदतीसाठी पुढे आले आहे. निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी सरकारने कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंगळवारी दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारला या प्रकरणाची माहिती आहे आणि कायदेशीर पर्यायांचा शोध घेण्यासाठी कुटुंबाला मदत केली जात आहे.

निमिषा प्रियाच्या प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जयस्वाल म्हणाले की, येमेनमध्ये निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेल्या शिक्षेची आम्हाला माहिती आहे. आम्हाला समजले आहे की त्याचे कुटुंब योग्य पर्याय शोधत आहे. या प्रकरणी सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. यापूर्वी सोमवारी येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल-अलीमी यांनी मूळची केरळची असलेल्या निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्याच्या अंतिम आदेशावर स्वाक्षरी केली. एका महिन्याच्या आत तिला मृत्यूदंड दिला जाईल, असे या अहवालात म्हटले आहे.

कोण आहे निमिषा प्रिया?

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निमिषा प्रियाला २०१७ मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो मेहदी यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. निमिषा २०१२ मध्ये नर्स म्हणून येमेनला गेली होती. २०१५ मध्ये निमिषा आणि तलाल यांनी तिथे क्लिनिक सुरू केले. तलालने क्लिनिकमध्ये भागधारक म्हणून आपले नाव समाविष्ट करून आणि निमिषाचा पती असल्याचे भासवून फसवणुकीने अर्धी रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला. याबाबत निमिषाने चौकशी केली असता दोघांमध्ये वाद सुरू झाला. तलालने तिच्यावर अत्याचार आणि लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.

निमिषाने दिले नशेचे इंजेक्शन

या छळाला कंटाळून निमिषाने जुलै २०१७ मध्ये तलालला अंमली पदार्थाचे इंजेक्शन दिले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. निमिषा म्हणते की तिचा त्याला मारण्याचा हेतू नव्हता आणि तिला फक्त तलालकडून तिचा पासपोर्ट परत घ्यायचा होता. निमिषाची आई प्रेमकुमार यांनी येमेनमध्ये जाऊन आपल्या मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण येमेनच्या कनिष्ठ न्यायालयाने निमिषाला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. त्याचवेळी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर