एक विवाह असा ही..! बॉसने सुट्टी न दिल्याने तुर्कीतील तरुणाने व्हिडिओ कॉलवर केला भारतातील तरुणीशी निकाह
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एक विवाह असा ही..! बॉसने सुट्टी न दिल्याने तुर्कीतील तरुणाने व्हिडिओ कॉलवर केला भारतातील तरुणीशी निकाह

एक विवाह असा ही..! बॉसने सुट्टी न दिल्याने तुर्कीतील तरुणाने व्हिडिओ कॉलवर केला भारतातील तरुणीशी निकाह

Nov 09, 2024 06:49 PM IST

मॅनेजरने रजा देण्यास नकार दिला. अदनानला लग्न करायचं होतं आणि त्याला नोकरीही गमवायची नव्हती. अशा तऱ्हेने त्याने व्हिडिओ कॉलवर लग्न केले. अदनान मोहम्मदच्या कुटुंबियांनी सांगितले की, तो तुर्कस्तानमध्ये होता तर मुलगी मंडीमध्ये होती. अशा तऱ्हेने व्हिडिओ कॉलवर लग्न पार पडले.

व्हर्च्युअल निकाह
व्हर्च्युअल निकाह

लग्न समारंभातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच लग्नासाठी नवनवीन डेस्टिनेशन्स आणि कलुप्त्या शोधल्या जातात.  सध्या हिमाचल प्रदेशमधील एक विवाह सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे.  चक्क व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून येथे एक विवाह सोहळा पार पडला. त्याचं झालं असं की, अदनान मोहम्मद नावाचा तरुण तुर्कस्तानमध्ये राहतो आणि तिथल्या एका कंपनीत कामाला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथील एका मुलीशी त्याचे लग्न ठरले होते, त्यासाठी त्याने कंपनीत रजेसाठी अर्ज केला होता.  मात्र  मॅनेजरने त्याला सुट्टी देण्यास नकार दिला. अदनानला लग्न करायचं होतं, आणि त्याला नोकरीही सोडायची नव्हती. 

यासाठी त्याने अभिनव कल्पना शोधून काढली. त्याने व्हिडिओ कॉलवर भारतातील मुलीशी लग्न करण्याच निर्णय घेतला व तडीस नेलाअदनान मोहम्मदच्या कुटुंबियांनी सांगितले की, तो तुर्कस्तानमध्ये होता, तर मुलगी हिमाचल प्रदेशमधील मंडी शहरामध्ये होती. अशा तऱ्हेने व्हिडिओ कॉलवर हे लग्न पार पडले.

अदनान मोहम्मद हिमाचल प्रदेशातील बिलासपूरचा रहिवासी आहे, तर त्याची पत्नी मंडी जिल्ह्यातील आहे. मुलीचे आजोबा आजारी असून त्यांनाही हे लग्न लवकर व्हावे अशी इच्छा होती. अशा तऱ्हेने मुलगा आणि मुलगी दोघांच्याही कुटुंबीयांनी व्हर्च्युअल लग्नाला होकार दिला. सोमवारी हा विवाह सोहळा पार पडला. हे जोडपं व्हिडिओ कॉलिंगवर कनेक्ट झालं, तर काझीनं हे लग्न लावून दिलं. यावेळी दोघांनी तीन वेळा ‘कुबूल है-कुबूल है’ म्हटलं आणि यासोबतच लग्न पूर्ण झालं. मुलीचे काका अक्रम मोहम्मद यांनी सांगितले की, आज आपल्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळेच सुट्टी न घेता लग्न पार पडले.

पूर आणि भूस्खलनामुळे याआधीही झाले होते व्हर्च्युअल वेडिंग -

गेल्या वर्षी हिमाचलमध्ये असेच एक व्हर्च्युअल वेडिंग झाले होते. सिमल्यातील कोटगड येथील रहिवासी आशिष सिंधा आणि कुल्लूमधील भुंतर येथील रहिवासी शिवानी ठाकूर यांचा विवाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाला. मात्र, नोकरीच्या सक्तीमुळे किंवा रजा मिळविण्याच्या सक्तीमुळे हे घडले नाही. याचे कारण म्हणजे या भागात मोठ्या प्रमाणात पूर आला आणि भूस्खलनही झाले होते. अशाप्रकारे वर्षभरात हिमाचल प्रदेशात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन विवाह झाले आहेत. मोहम्मद अदनान म्हणतो की तो सुट्टी मिळताच येईल आणि आपल्या वधूला भेटेल.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर