मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NIACL Recruitment : एनआयएसीएलमध्ये असिस्टंट पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

NIACL Recruitment : एनआयएसीएलमध्ये असिस्टंट पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 01, 2024 03:05 PM IST

NIACL Assistant Recruitment 2024: एनआयएसीएलमध्ये पदांच्या ३०० जागांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

NIACL Assistant Recruitment 2024
NIACL Assistant Recruitment 2024

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच एनआयएसीएलमध्ये असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली.  या पदासाठी आजपासून (०१ फेब्रुवारी) अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार न्यू इंडियाची अधिकृत वेबसाइट newindia.co.in द्वारे अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत ३०० पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे.  या पदासाठी पूर्व परीक्षा २ मार्च २०२४ रोजी घेण्यात येईल. 

पात्रता

उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवार एसएससी/एचएससी/इंटरमीडिएट/ग्रॅज्युएशन स्तरावर एक विषय म्हणून इंग्रजीमध्ये उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे ०१ जानेवारी २०२४ रोजी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षादरम्यान असावी.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा (पूर्व आणि मुख्य परीक्षा) असतील. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अंतिम निवडीपूर्वी प्रादेशिक भाषा चाचणीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात होणार मेगा पोलीस भरती; तब्बल १७,४७१ पदे भरली जाणार

अर्ज शुल्क

एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क १००/- रुपये आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी प्रवर्ग वगळता इतर सर्व उमेदवारांना ८५०/- रुपये भरावे लागतील. केवळ डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार एनआयएसीएलची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

WhatsApp channel