NHPC Recruitment 2024: परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; एनएचपीसीमध्ये 'या'पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NHPC Recruitment 2024: परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; एनएचपीसीमध्ये 'या'पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज!

NHPC Recruitment 2024: परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी; एनएचपीसीमध्ये 'या'पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज!

Published Apr 28, 2024 01:32 PM IST

NATIONAL HYDROELECTRIC POWER CORPORATION LIMITED: एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू प्रक्रिया सुरू झाली आहे.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागिवले जात आहेत.
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागिवले जात आहेत.

Government Job 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National Hydroelectric Power Corporation Limited) म्हणजेच एनएचपीसीने शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार nats.education.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

BHEL Recruitment 2024: दरमहा १ लाख पगार, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती!

'या' पदांसाठी भरती

एनएचपीसीमध्ये एकूण ५७ एकूण रिक्त जागेवर भरती केली जाणार आहे.

आयटीआय अप्रेंटिसशिप: फिटर- २ जागा, इलेक्ट्रिशियन- १३ जागा, ड्राफ्ट्समन- २ जागा, प्लंबर- २ जागा, COPA- १८ जागा.

डिप्लोमा अप्रेंटिसशिप: सिव्हिल- ५ जागा, इलेक्ट्रिकल- ४ जागा आणि GNM- ४ जागा.

पदवीधर प्रशिक्षणार्थी: हॉटेल मॅनेजमेंट- एक जागा, फार्मासिस्ट पदवीधर- २ जागा.

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Coal Ministry Recruitment 2024 : कोळसा मंत्रालयात नोकरीची संधी, पगार ७५ हजार मिळणार; परीक्षा न घेता निवड!

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यास पात्र असण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था/कॉलेज/विद्यापीठातून आटीआय/डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

Police Bharti : खुशखबर..! महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांची आयटीआय/डिप्लोमा/ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जाईल. आवश्यक असल्यास निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते आणि त्यानुसार ऑफर पाठविली जाईल.

Agniveer Recruitment 2024: अग्निवीरसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच होत आहे बंद, वाचा पात्रता व अर्ज करण्याची पद्धत

अर्ज कसा करावा

- आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी https://apprenticeshipindia.org वर शिकाऊ उमेदवारी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी.

- डिप्लोमा धारक/ पदवीधरांनी https://nats.education.gov.in/student_type.php वर स्वतःची नोंदणी करावी

- पोर्टलवरून नोंदणी/ अप्लाय केलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या

- शैक्षणिक पात्रतेची सर्व स्वयं-साक्षांकित प्रमाणपत्रे, गुणपत्रिका आणि सर्व संबंधित प्रमाणपत्रांची प्रिंटआउट महाव्यवस्थापक (एचआर), पार्बती -II HE प्रकल्प, नागवेन, जिल्हा- मंडी, हिमाचल प्रदेश या पत्त्यावर पाठवावी.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर