NHAI to increase road toll charges: देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या टोलवाढीला स्थगिती दिल्यानंतर आजपासून (सोमवार, ०३ जून २०२४) देशभरातील रस्ते टोल शुल्कात तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. परिणामी, सर्वसामन्यांना मोठा झटका बसणार आहे.
महागाईच्या अनुषंगाने भारतातील टोल शुल्कात दरवर्षी सुधारणा केली जाते आणि आजपासून महामार्गावरील सुमारे ११०० टोल नाक्यांवर ३% ते ५% वाढ करण्याची घोषणा स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये केली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीदरम्यान स्थगित करण्यात आलेली टोल शुल्क दरवाढ ३ जूनपासून लागू होईल.
टोल आकारणी आणि इंधन उत्पादनांवरील करात वाढ केल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी पैसे मोजावे लागतात. परंतु, विरोधी पक्ष आणि अनेक वाहनचालक वार्षिक शुल्कवाढीवर टीका करतात आणि म्हणतात की यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा वाहतूक खर्च वाढतो आणि प्रवाशांवर बोजा पडतो.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स आणि अशोक बिल्डकॉन लिमिटेड सारख्या हाय ऑपरेटर्सना टोलवाढीचा फायदा होणार आहे. सुमारे १,४६,००० किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारासाठी भारताने गेल्या दशकात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
रस्ते वाहतुकीत वाढ तसेच टोल नाक्यांची संख्या आणि शुल्कात वाढ झाल्याने टोल वसुली २०१८/१९ मधील २५२ अब्ज रुपयांवरून २०२२/२३ या आर्थिक वर्षात ५४० अब्ज रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.
भारताच्या विस्तृत राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कमध्ये अंदाजे ८५५ टोल प्लाझा आहेत. त्यापैकी सुमारे ६७५ सार्वजनिक अनुदानित आहेत. तर, उर्वरित १८० सवलतीधारकांद्वारे चालवले जातात. टोल वाढ ही राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ अंतर्गत येते. लोकसभा निवडणुका संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोलच्या दरात वाढ करण्यात आली. यामुळे सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला खात्री लागणार आहे. वाढ टोलमुळे फळे आणि फळभाज्यांसह इतर गोष्टीच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या