Claim: लोकसभा निवडणूक हरल्यानंतर हैदराबादच्या भाजप उमेदवार माधवी लता यांनी आपली राजकीय भूमिका बदलली, मुस्लिम कधीही दहशतवादी असू शकत नाहीत.
Fact Check : हा दावा दिशाभूल करणारा आहे. माधवी लता यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ १९ एप्रिल रोजी त्यांच्या हैदराबादमध्ये एका प्रचार रॅलीतील आहे.
हैदराबाद: हैदराबाद लोकसभा मतदार संघात भाजपच्या तिकिटावर लढलेल्या कोम्पेला माधवी लता यांचा AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ३ लाखांहून जास्त मतांनी पराभव केला. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या माधवी लता यांच्यावर १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमी मिरवणुकीत मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा देखील झाला होता. याशिवाय, निवडणूक मतदानादरम्यान बुरखा घातलेल्या महिलांची ओळखपत्रे तपासण्यात यावी असे देखील विधान त्यांनी केले होते. यावरून देखील माधवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. यात त्या मुस्लिम कधीच दहशतवादी असू शकत नाही, असे म्हणत आहेत. माधवी लता यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, मुस्लिम दहशतवादी आहेत का असे विचारले असता, माधवी लता यांनी त्यावर उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, 'भारतीय मुस्लिम कधीही दहशतवादी असू शकत नाहीत, परंतु धर्माच्या नावावर दिशाभूल करणाऱ्या गरिबीतील तरुणांबद्दल काय असे माधवी लता या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांचा दावा आहे की, माधवी लता या निवडणुकीत हरल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे.
एका फेसबुक यूझरने कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला, "निवडणूक हरल्यानंतर जिज्जींना शहाणपण सुचले. " (संग्रहण)
फॅक्ट चेक
या व्हिडिओची सत्यता न्यूजमीटरने पडताळून पाहण्यासाठी फॅक्ट चेक केले आहे. यात असे आढळून आले की व्हायरल होणारा हा व्हिडिओ १९ एप्रिल २०२४ च्या , लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीचा आहे.
हा व्हिडिओ शोधण्यासाठी गुगलवार कीवर्डचा शोध घेऊन तसेच रिव्हर्स इमेजिंगने खरा व्हिडिओ न्यूज मीटरच्या टीमने शोधला. न्यूज मीटरच्या टीमला २२ एप्रिल २०२४ रोजी अपलोड केलेल्या हैदराबाद फेस्टिव्हल्स या YouTube चॅनेलवरील व्हिडिओचा खरा व्हिडिओ टीमने शोधला.
१:४३ मिनीटांच्या व्हिडिओमध्ये, मुलाखतकाराने माधवी लता यांना एक प्रश्न विचारला. यात त्याने सीसीए आणि एनआयसी या सरकारच्या प्रस्तावित कायद्यांचा भारतीय मुस्लिमांवर कसा परिणाम होईल. व्हायरल क्लिप व्हिडिओमध्ये १:१८ - १:४३ मिनिटांचा व्हिडिओ कापन्यात आला आहे.
मुलाखत घेणार कॅमेरामागील व्यक्ती मीर मुकरम सुलतान हा मुस्लिम कायद्याचा विद्यार्थी असल्याचे द प्रिंटने वृत्त दिले आहे. रामनवमी मिरवणुकीत माधवी यांच्या वादग्रस्त व्यक्तव्य व विविध मुद्द्यांवर मुकरम याने त्यांना विविध प्रश्न माधवी यांना विचारले. यावेळी त्यांनी मशिदी कडे बोट दाखवल्याने देखील गदारोळ झाला होता. यानंतर त्यांनी सावरा सावर करत त्यांच्या हाव भावाबद्दल खुलासा केला होता. त्या म्हणल्या होत्या की कॅमेरा अॅंगल वापरुन त्यांच्या विरोधात हा खोटा प्रचार करण्यात आला होता.
हा व्हायरल झालेला व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. माधवीने निवडणूक प्रचारादरम्यान मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ निवडणुकीत पराभवानंतर त्यांना आलेली उपरती या दृष्टीने शेअर करून व्हायरल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या