‘मला मूल जन्माला घालायचंय, स्पर्म प्रिझर्व्ह करा…’, पतीच्या मृत्यूनंतर नवविवाहितेची मागणी, पण डॉक्टर म्हणाले..
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘मला मूल जन्माला घालायचंय, स्पर्म प्रिझर्व्ह करा…’, पतीच्या मृत्यूनंतर नवविवाहितेची मागणी, पण डॉक्टर म्हणाले..

‘मला मूल जन्माला घालायचंय, स्पर्म प्रिझर्व्ह करा…’, पतीच्या मृत्यूनंतर नवविवाहितेची मागणी, पण डॉक्टर म्हणाले..

Dec 23, 2024 10:11 PM IST

मध्य प्रदेशातील रीवा मध्ये एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर केलेली विचित्र मागणी ऐकून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. वास्तविक, ही महिला आपल्या पतीच्या मुलाला जन्म देण्यासाठी मृत पतीचे शुक्राणू जतन करण्याची मागणी करत होती.

पतीच्या  मृत्यूनंतर नवविवाहितेची डॉक्टरांकडे विचित्र मागणी
पतीच्या मृत्यूनंतर नवविवाहितेची डॉक्टरांकडे विचित्र मागणी

मध्य प्रदेशातील रीवामध्ये एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर केलेली विचित्र मागणी ऐकून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त करत महिलेने आपल्या मृत पतीच्या शुक्राणूंची (स्पर्म) मागणी केली.  यासाठी महिलेने डॉक्टरांना मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यापासून रोखले.  मात्र,  डॉक्टर तिची मागणी पूर्ण करू शकले नाहीत. पतीचा मृत्यू होऊन २४ तास उलटून गेल्याने तसेच रुग्णालयात स्पर्म जतन करून ठेवण्याची सुविधा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर डॉक्टर व नातेवाईकांनी महिलेची कशीबशी समजूत काढून तिला शांत केले व त्यानंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.ले.

या दोघांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पतीचा मृत्यू झाल्यानंतर महिलेने त्याच्यापासून मूल जन्माला घालण्याची इच्छा व्यक्त केली. प्रत्यक्षात २४ तासांच्या आत शुक्राणू जतन करणे आवश्यक असून वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा नसल्याचे सांगत डॉक्टरांनी शुक्राणू जतन करण्यास नकार दिला. यानंतर कसेबसे महिलेला शांत करून मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी राजी करण्यात आले.

सीधी जिल्ह्यातील चुरहाट येथील रहिवासी जितेंद्र सिंग गहरवार यांचा रीवा शहरातील बिछिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस लाइनजवळ झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी संजय गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी शहराबाहेर असलेल्या पत्नीला फोनवरून माहिती देण्यात आले. तिने पतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या आगमनाची वाट पाहिली. जेव्हा ही महिला रीवा येथे पोहोचली तेव्हा तिने आपल्या पतीचे शुक्राणू जतन करण्याची अत्यंत विचित्र मागणी पोलिस प्रशासनाकडे केली. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनी २४ तासांहून अधिक काळानंतर मृताच्या शरीरातील शुक्राणू जतन करण्यास नकार दिला.

मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाचे एचओडी डॉ. रजनीश कुमार पांडे यांनी सांगितले की, मृत व्यक्तीच्या शरीरातील शुक्राणू २४ तासांच्या आत जतन करणे आवश्यक असते. अधिक वेळ गेल्यानंतर शुक्राणू जतन करता येत नाहीत. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात ही प्रक्रिया अवलंबण्याची सोय नाही. डॉक्टरांनी हात वर करताच मृताच्या पत्नीने गोंधळ घातला. डॉक्टर आणि पोलिसांनी खूप समजावल्यानंतर महिला शांत झाली आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर