Viral Video: अलिकडच्या काळात सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे लोक त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि महत्त्वाच्या गोष्टी लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर एका नवविवाहित जोडप्यानं चक्क त्यांच्या हनीमूनचा व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये नवविवाहित जोडपे त्यांच्या हनीमूनबद्दल बोलताना दिसत आहेत आणि एकमेकांचे चुंबन घेत आहेत. हे जोडपे हनीमूनसाठी सजवण्यात आली बेड आणि संपूर्ण खोली दाखवत आहेत. या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. या व्हिडीओमध्ये कोणतेही अश्लील दृश्य नसले तरी काही युजर्स नवविवाहित जोडप्यामधील संभाषण आणि दाखवलेल्या बेडवर नको त्या कमेंट करत आहेत. यातील काही जणांनी आता एवढेच पाहायचे राहिले होते, अशी कमेंट केली आहे.
व्हिडिओ पाहून असा अंदाज लावता येऊ शकतो की, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण आणि तरुणीचे नुकतेच लग्न झाले आहे. याआधीही तरुणाने अनेक व्हिडिओ आणि रील बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, आता त्याने चक्क आपल्या हनीमूनचा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पहिल्यानंतर एका युजरने म्हटले आहे की, हे व्लॉगर्स पूर्णपणे वेडे झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.परंतु, व्हिडिओमध्ये जोडपे हिंदी भाषेत एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना सोशल मीडियाचे वेड लागले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण आपला अनुभव लोकांपर्यंत पोहोचवतात. मात्र, अलिकडच्या काळात सोशल मीडिया हे अनेकांसाठी प्रसिद्ध मिळवण्याचं प्लॅटफॉर्म बनले आहे. सोशलवर प्रसिद्ध मिळवण्यासाठी एखादा व्यक्ती कुठल्या थरापर्यंत जाईल, याचा काही नेम नाही. सध्या व्हायरल होत असलेला जोडप्याचा हनीमूनचा व्हिडिओ तसाच काही प्रकार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
संबंधित बातम्या