Viral News: काही वेळा काही लोक असे व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करतात, जे व्हायरल झाल्यानंतर त्यांना आपली चूक समजते. मनालीला हनिमूनसाठी गेलेल्या एका जोडप्यासोबत असेच काही घडले. लग्नानंतर त्यांनी मनातील एका हॉटेलमध्ये हनीमून साजरा केला, ज्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून अशा खाजगी क्षणाते व्हिडिओ पुन्हा शेअर करू नका, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एका नवविवाहित जोडप्याने त्यांच्या हनीमूनदरम्यानचे खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या जोडप्याने हनीमूनपूर्वी केक कापताना आणि कॅन्डल लाईट डिनरची झलकही शेअर केली. या व्हिडिओची सुरुवात फुलांनी सजवलेल्या बेडपासून होते. त्यावर हॅपी हनीमून लव्ह, असेही लिहिलेले दिसत आहे. बेडवर कपड्यांपासून बनवण्यात आलेले हंस देखील दिसत आहे. त्यानंतर खोलीच्या मध्यभागी ठेवलेल्या टेबलवर देखील फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आले. याशिवाय, टेबलवर, पळे, केकसह शॅम्पेनेची बॉटल आणि दोन ग्लास ठेवलेले दिसत आहे. पुढे व्हिडिओमध्ये हे जोडपे त्यांचा हनीमून केक कापताना, सोफ्यावर बसून एकमेकांना खाऊ घालताना दिसत आहे. यानंतर या जोडप्याने शॅम्पेन प्यायले. त्यानंतर जोडपे रोमँटिक कँडललाइट डिनरचा आनंद घेताना दिसत आहेत.
शॉन मित्रा यांनी डिसेंबरमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'मनालीमध्ये हनीमून नाईट' असे लिहिले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'मित्रा, हे खाजगी क्षणाचे व्हिडिओ शेअर करू नका', असे एका युजरने म्हटले आहे.