मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अरे देवा! महिला खासदाराला होता दुकानातून महागडे कपडे चोरण्याचा छंद, पकडली गेल्यावर काय झाले वाचा

अरे देवा! महिला खासदाराला होता दुकानातून महागडे कपडे चोरण्याचा छंद, पकडली गेल्यावर काय झाले वाचा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 16, 2024 09:21 PM IST

MP Theft Luxury Cloths : चोरी करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला खासदाराला नाईलाजने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 mp golriz ghahraman allegation of luxury cloths theft
mp golriz ghahraman allegation of luxury cloths theft

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मोठ्या पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून सामान्य लोकांना चांगल्या कामाची व वर्तनाची अपेक्षा असते. मात्र जर तुम्हाला समजले की, खासदार जर चोरी करत असेल तर, आश्चर्य होणे साहजिकच आहे. मात्र असा प्रकार न्यूझीलंडमध्ये समोर आला आहे. येथील एका महिला खासदारावर दुकानातून एकदा नव्हे तर तीन वेळा महागडे व ब्रँडेड कपडे चोरी केल्याचा आरोप आहे.

चोरी करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला खासदाराला नाईलाजने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कपडे चोरी करणारी महिला खासदार न्यूझीलंडमधील आहे. न्यूझीलंडमधील ग्रीन पार्टीची महिला  खासदार गोलरिज घरमन यांच्यावर ब्रँडेड कपडे चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी ऑकलंड आणि वेलिंग्टनमधील दोन वेगवेगळ्या दुकानांतून तीन वेळा कपडे चोरी केले आहेत. 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकार वकील गोलरिज यांनी २०१७ मध्ये  आपल्या पक्षातील न्याय विभागाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, कामाच्या तनावामुळे त्यांनी चुकीचा व्यवहार केला आहे. मी अनेक लोकांना नाराज केले असून याचा मला पश्चाताप होत आहे.

इराण मधून न्यूझीलंड आली होती पळून - 
गोलरिज घरमन आपल्या कुटूंबासह बालपणीच इराणमधून पळून गेली होती. त्यानंतर तिच्या कुटूंबाने न्यूझीलंडमध्ये राजकीय शरण घेतली होती. त्यांच्यावर चोरीचा आरोप झाल्यानंतर मंगळवारी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. एक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या व्हिडिओमध्ये त्या ऑकलंडच्या एका दुकानातून एक डिझायनर हँडबॅग चोरी करताना दिसत आहेत.

WhatsApp channel

विभाग