Hijab Mugshot Row : पोलिसांनी महिलांचा बुरखा काढून घेतले फोटो; आता द्यावे लागणार १४५ कोटींची भरपाई, काय आहे प्रकार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hijab Mugshot Row : पोलिसांनी महिलांचा बुरखा काढून घेतले फोटो; आता द्यावे लागणार १४५ कोटींची भरपाई, काय आहे प्रकार

Hijab Mugshot Row : पोलिसांनी महिलांचा बुरखा काढून घेतले फोटो; आता द्यावे लागणार १४५ कोटींची भरपाई, काय आहे प्रकार

Apr 06, 2024 08:34 PM IST

Hijab Mugshot Row : फोटो काढण्यासाठी जबरदस्तीने बुरखा काढायला लावल्याप्रकरणाची मॅनहॅटन न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने जमीला क्लार्क आणि अरवा अजीज या दोन मुस्लीम महिलांनी दाखल केलेल्या खटल्याचा निपटारा करण्यासाठी १७.५ दशलक्ष डॉलर्स (१४५ कोटी रुपये) देण्याचे मान्य केले.

मगशॉटसाठी बुरखा काढायला लावल्याने  सरकारने महिलांना १४५ कोटींची भरपाई द्यावी असा कोर्टाचा आदेश
मगशॉटसाठी बुरखा काढायला लावल्याने सरकारने महिलांना १४५ कोटींची भरपाई द्यावी असा कोर्टाचा आदेश (Pixabay)

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात (New York City) मुस्लिम महिलांचा बुरखा काढून मगशॉट घेण्याचे प्रकरण (Muslim Women Mugshot) चांगलेच तापले आहे. या प्रकरणात संबंधित मगिलांनी सरकारविरोधात खटला दाखल केला होता. या खटल्याच्या निपटाऱ्यासाठी सरकार १४५ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यास तयार झाली आहे. मगशॉट असा फोटो असतो, ज्यामध्ये एखाद्या आरोपीच्या चेहऱ्याचा क्लोज अप फोटो घेतला जातो. मगशॉट विशेष करून पोलीस रेकॉर्ड किंवा ऑफिशियल कामकाजासाठी घेतला जातो. फोटोसोबत आरोपीचे फिंगर प्रिंट, उंची व वजन अशी वैयक्तिक माहितीही घेतली जाते. 

खटला दाखल करणाऱ्या महिलांची नावे जमीला क्लार्क आणि अरवा अजीज अशी आहे. जमीलाला ९ जानेवारी २०१७ रोजी अटक केली होती आणि अरवा यांनी त्याचवर्षी ३० ऑगस्ट रोजी. त्यांनी आरोप केले आहेत की, अटक केल्यानंतर त्यांनी त्यांचा बुरखा काढण्यास सांगितले गेले. यामुळे त्यांना खूप लाजीरवाणं वाटलं. २०१८ मध्ये जमीला क्लार्क आणि अरवा अझीझ यांनी बनावट संरक्षण आदेश मोडल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर हा खटला दाखल केला होता. या दोघांना २०१७ मध्ये अनुक्रमे मॅनहॅटन आणि ब्रुकलिन मध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, जमीलाच्या पतीने खोटी केस टाकून तिला अटक केली होती. अटक करताना पोलिसांनी बुरखा न काढल्यास जमीलावर खटला भरण्याची धमकी दिली. अरवा यांनाही एका खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आरोप आहे की, जेव्हा त्यांचा बुरखा काढून फोटो घेतले जात होते तेव्हा तेथे ३० हून अधुक पुरुष कैदी उपस्थित होते. ते अरवाला पाहत होते. यामुळे अरवाच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यांच्या वकीलांनी सांगितले की. एखाद्याला धार्मिक कपडे काढण्यास मजबूर करणे कपडे काढून झडती घेण्यासारखे आहे. ५ एप्रिल रोजी आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.  मॅनहट्टन न्यायालयाने मंजूर केली आहे. क्लार्क आणि अझीझ यांचे वकील अल्बर्ट फॉक्स कॅन यांच्या मते, हा तोडगा न्यूयॉर्ककरांच्या धार्मिक आणि गोपनीयतेच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

शहरातील कायदा विभागाचे प्रवक्ते निक पाओलुसी यांनी एका निवेदनात म्हटले की, या सर्व महिलांना या आदेशानुसार पैसे मिळतील ज्यांना १६ मार्च २०१४ ते २३ ऑगस्ट २०२१ दरम्यान डोक्यावरून हिजाब काढण्या मजबूर केले होते. हा पैसा जवळपास ४,१०० पात्र सदस्यांमध्ये वाटला जाईल. प्रत्येक महिलेला जवळपास साडे ६ लाख रुपये मिळण्याची गँरेंटी आहे.

जमीला क्लार्क आणि अरवा अजीज यांनी शेअर केला भयानक अनुभव -

जमीला क्लार्क आणि अरवा अझीझ यांनी सांगितले की, मुस्लिम महिलांनी इस्लामी धर्माचे पालन करताना घातलेले कपडे काढून टाकण्यास भाग पाडल्यानंतर त्यांना लाज वाटली.  क्लार्कने तिच्या वकिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा त्यांनी मला हिजाब उतरवण्यास भाग पाडले तेव्हा मला असे वाटले की मी नग्न आहे. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी हजारो  न्यूयॉर्ककरांनी  महत्त्वाची भूमिका बजावल्याने ही अभिमानाची भावना आहे, असे त्या म्हणाल्या.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर