New Year 2025 Alcohol Limits: वर्ष संपत असताना आणि लोक २०२५ मध्ये जल्लोषाच्या तयारीत असताना, भारतातील प्रमुख शहरांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी नियम लागू केले आहेत. शहर पोलीस, वाहतूक विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकासह प्रशासनाने सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दरम्यान, पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा अनेकदा लोक घरातच पार्टीचे नियोजन करतात. परंतु, घरांमध्ये किती दारू ठेवली जाऊ शकते आणि याबाबत काय नियम आहेत? याची तुम्हाला माहिती आहे का? एवढेच नव्हेतर घरात पार्टी करण्यासाठी ५०० रुपयांचा एक दिवसाचा परवाना घ्यावा लागतो.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षासाठी वेगळा नियम नाही. सर्व राज्यांमध्ये, एखादी व्यक्ती घरामध्ये प्रति व्यक्ती जेवढी परवानगी आहे तेवढीच दारू ठेवू शकते. सर्व राज्यांसाठी मर्यादा वेगळी आहे. उत्तर प्रदेशमध्ये घरात फक्त १.५ लीटर देशी किंवा विदेशी दारू ठेवू शकतात. दोन लीटरपर्यंत वाइन ठेवू शकतात. ६ लीटरपर्यंत बिअर ठेवू शकतात.पण त्यासाठी तुम्हाला एक दिवसाचा ५०० रुपयांचा परवाना घेणे आवश्यक आहे, नाहीतर पोलीस तुम्हाला अटक करू शकतात.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत बार, रेस्टॉरंट आणि पब पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची शिथिल वेळ आणि सुरक्षेची खात्री करण्यासाठी पोलिसांकडून कडक देखरेख ठेवली जाते. दरम्यान, नवीन वर्षाच्या तिकिटांचे आयोजन करणाऱ्या थ्री स्टार हॉटेल, क्लब, बार आणि रेस्टॉरंट्सना किमान १५ दिवस अगोदर परवानग्या घेणे बंधनकारक केले आहे. या आस्थापनांनी सर्व प्रवेश, बाहेर पडणे आणि पार्किंग च्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आऊटडोअर साउंड सिस्टीम रात्री १० वाजेपर्यंत बंद करणे आवश्यक आहे आणि इनडोअर साउंड सिस्टीम रात्री १ वाजेपर्यंत ४५ डेसिबलपर्यंत मर्यादित आहे. आयोजकांनी अंमली पदार्थांच्या वापरावर कडक बंदी घालावी, पार्किंग आणि निर्जन ठिकाणी अधिक दक्षता घ्यावी.
उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम ३६ (१) (१) चा हवाला देत मद्यप्राशन व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी आस्थापनांना मद्यपी व्यक्तींना मद्यपान न करण्याचा इशारा दिला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असून, १० हजार रुपयांपर्यंत दंड, तुरुंगवास आणि वाहने जप्त करण्यात येणार आहेत.