मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  vande bharat express : वंदे भारत एक्स्प्रेसने मोडला बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड; ५२ सेकंदात तब्बल १०० किमी

vande bharat express : वंदे भारत एक्स्प्रेसने मोडला बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड; ५२ सेकंदात तब्बल १०० किमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 10, 2022 02:07 PM IST

Vande Bharat Express News : वंदे भारत एक्स्प्रेसने ट्रायल रन दरम्यान नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. केवळ ५२ सेकंदात या रेल्वेने ० ते १०० किमी प्रती तास वेग प्राप्त करत बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड तोडला आहे.

वंदे भारत एक्सप्रेस
वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat Express: तिसरी आणि नवी वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रन नुकतीच झाली असून या रेल्वेने केवळ ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतीतास वेग प्राप्त करत बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड तोडला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती शुक्रवारी दिली. या सोबतच वैष्णव म्हणाले, फोटोकैटलिटिक एयर प्यूरीफायर यंत्रणेने वंदे भारत रेल्वेला कोरोना तसेच हवेतून पसरणाऱ्या सर्व आजारपासून प्रवाशांना मुक्त ठेवेल. ही सेमी-हाई स्पीड येत्या काही दिवसांत अहमदाबाद-मुंबई धावण्यासाठी तयार झाली आहे.

ट्रायल रन बाबत माहिती देताना रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले, “वंदे भारत रेल्वेच्या तिसऱ्या चाचणीचे परीक्षण झाले यशस्वी झाले आहे. गुरुवारी हे परीक्षण करण्यात आले. यावेळी या रेल्वेने ० ते १०० किमी प्रती तासाचा वेग हा केवळ ५२ सेकंदात मिळवला. हाच वेग बुलेट ट्रेनला मिळवायचा असेल तर त्यासाठी ५४.६ सेकंदचा वेळ लागतो. या रेल्वेकहा सर्वाधिक वेग हा १८० किमी प्रति तास एवढा आहे. तर जुन्या वंदे भारत रेल्वेचा सर्वाधिक वेग हा १६० प्रतीतास होता.

वैष्णव म्हणाले, आरामशिर प्रवासाठी या रेल्वेत अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. गुणवत्ता आणि प्रवासाच्या सुविधांमध्ये सुधारणा कणाऱ्यात आली आहे. यामुळे या रेल्वेला ३.२ चे रेटिंग देण्यात आले आहे. तर जागतिक स्थरावर हे रेटिंग २.९ एवढे आहे.

वंदे भारत मध्ये नवी वातानुकूलित यंत्रणा

फोटोकैटलिटिक एयर प्यूरीफायर यंत्रणा हे नव्या वंदे भारत रेल्वेचे वैशिष्ट्य आहे. कोरोना तसेच हवेतून पासरणाऱ्या अनेक रोगापासून ही रेल्वे प्रवाशांना सुरक्षित ठेवणार आहे. रेल्वे मंत्रालयाने पॉयलेट प्रोजेक्ट अंतर्गत नव्या वंदे भारत रेल्वे गाडीत ही विषाणु रोधक यंत्रणा लागू केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व ४०० रेल्वे गाड्यांमध्ये तसेच प्रीमियम राजधानी, शताब्दी, दुरंतो सहित आदी गाड्यांमध्ये ही यंत्रणा लागू केली जाणार आहे. रेल्वेची सर्व चाचणी यशस्वी झाली आहे. या रेल्वे मार्गाची घोषणा देखील लवकरच केली जाणार आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग