Coronavirus Vaccine: कोरोना व्हायरस लसीच्या दुष्परिणामांबाबत मोठा वाद सुरू असतांना आता आणखी एक मोठी बातमी पुढे आली आहे. कोविशील्ड और कोवैक्सीन ज्यांनी घेतली आहे, अशा नागरिकांचे टेशन आता वाढणार आहे. या लसीच्या दुष्परिणामांची भीती दाखवून नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचे पुढे आले आहे. सायबर चोरटे या माहितीचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. सुदैवाने आत्तापर्यंत कोणाचेही आर्थिक नुकसान झालेले नाही. अनोळखी क्रमांकावरून सायबर चोरटे फोन करत असून अशा भामट्यांपासून सावध राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की फसवणूक करणारे लसीबद्दल माहिती देण्याच्या बहाण्याने नागरिकांना कॉल करत आहेत. त्या माध्यमातून त्यांचा आधार क्रमांक, बँक तपशील यांसारखी वैयक्तिक माहिती चोरली जात आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे राहणाऱ्या काही नागरिकांना अज्ञात क्रमांकावरून कॉल आले असून आरोपी हे आरोग्य विभागातील असल्याची बतावणी करून कोरोना लसी बद्दल माहिती घेऊन खासगी माहिती चोरत असल्याचे म्हटले आहे.
लोकांना फोनकरून सायबर चोरटे अनेक प्रश्न विचारत आहेत. नागरिकांना त्यांनी लस घेतली आहे की नाही? जर घेत ली असून तर कोणती लस घेतली आहे? विशेष बाब म्हणजे फसवणूक करणारे आयव्हीआरएस म्हणजेच इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीमची मदत घेऊन ही फसवणूक करत आहेत, ज्याद्वारे ते लसीकरणाशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून खासगी माहिती चोरण्याच्या प्रयत्न करत आहेत.
कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'रेकॉर्ड केलेला आवाजात नागरिकांना कोविड लस घेतली आहे की नाही. याची माहिती विचारली जाते. जर घेतली असल्यास त्या व्यक्तीला एक बटण दाबण्यास सांगितले जाते. सहसा १ Covishield आणि २ क्रमांक हा Covaxin लसीसाठी असतो. यानंतर फोन ठेवला जातो आणि अचानक नेटवर्क जाऊन तुमची सर्व माहिती ही सायबर चोरटे चोरतात. रिपोर्टनुसार, सायबर तज्ज्ञांचे मत आहे की, याद्वारे व्यक्तीचा फोन हॅक करण्याचा प्रयत्न चोरटे करतात आणि फोन मधील सर्व वैयक्तिक माहिती चोरतात