मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इस्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक; छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी SSLV झाला सज्ज
SSLV प्रक्षेपक
SSLV प्रक्षेपक
05 August 2022, 12:46 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 12:46 IST
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) ने आता छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी नवा प्रक्षेपक तयार केला आहे. या प्रक्षेपकामुळे ५०० किलो पर्यन्तचे छोटे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडता येणार आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आतापर्यन्त अनेक अंतराळ मोहिमा राबवून देशाची मान जगात उंचावली आहे. चंद्रयान, मंगळयान मोहिमे नंतर आता इस्रोने व्यावसायिक उपग्रहाच्या प्रक्षेपणसाठी मोठे पाऊल उचलले आहे. या साठी एक नवी शाखा स्थापन करण्यात आली असून छोटी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी एका नव्या प्रक्षेपकाची निर्मिती इस्रोने केली आहे. या पूर्वी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाचा वापर केला जात होता. मात्र, आता ५०० किलो वजनाच्या उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी आता SSLV (Small Satellite Launch Vehicle) या रॉकेट प्रक्षेपकाची निर्मिती इस्रोने केली असून याचे पहिले उड्डाण हे ७ ऑगस्टला होणार आहे. जवळपास ५०० किलोमीटर उंचीपर्यंत उपग्रह या नव्या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जगात कमी किमतीत आणि लवकरात लवकर उपग्रह प्रक्षेपित करणारी संस्था म्हणजे इस्रोची ओळख आहे. जगभरातील अनेक देश त्यांचे उपग्रह हे इस्रो कडून प्रक्षेपित करून घेत आहेत. अनेक देशांच्या ऑर्डर या इस्रो कडे आल्या आहेत. यातील अनेक उपग्रह हे ५०० पेक्षा कमी वजनाचे आहेत. पीएसएलव्ही हे २००० पेक्षा जास्त तर २००० किलो वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी जीएसएलव्ही या प्रक्षेपकाचा वापर केला जातो. शिवाय हे छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आकाराने मोठा तसेच २९० टन वजनाचा असलेल्या polar satellite launch vehicle (PSLV) प्रक्षेपक सज्ज करावा लागतो. या साठी तब्बल ६५० कर्मचाऱ्यांना काही महिने आधी तयारी करावी लागते. मात्र इस्त्रोचा अवघ्या १०० टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांच्या टीमच्या साह्याने केवळ सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करता येऊ शकतो. SSLV जवळपास ३४ मीटर उंच आहे. त्याचा व्यास दोन मीटर एवढा आहे. यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टीची बचत होणार आहे. तसेच इस्रोला मोठ्या प्रमाणात याचा आर्थिक फायदा होणार आहे. यामुळे हा नवा प्रक्षेपक महत्वाचा ठरणार आहे.

SSLV ची SSLV-D1 नाव असलेली पहिली मोहीम ही ७ ऑगस्टला नियोजित आहे. सकाळी नऊ वाजून १८ मिनीटांनी श्रीहरीकोटा इथून प्रायोगिक उड्डाण होणार आहे. या उपग्रहातून १३५ किलोग्रॅम वजनाचा EOS 02 नावाचा मायक्रो सॅटेलाईट ( microsatellite) ३५० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. तसेच ७५० विद्यार्थ्यांनींनी बनवलेला आठ किलोग्रॅम वजनाचा AzaadiSAT हा उपग्रहही सोडला जाणार आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग