व्हॅटिकनच्या धर्तीवर स्वतंत्र मुस्लिम देश बनवणार, महिलांनाही पूर्ण स्वातंत्र्य देण्याची योजना-new muslim country like vatican city will formed know details ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  व्हॅटिकनच्या धर्तीवर स्वतंत्र मुस्लिम देश बनवणार, महिलांनाही पूर्ण स्वातंत्र्य देण्याची योजना

व्हॅटिकनच्या धर्तीवर स्वतंत्र मुस्लिम देश बनवणार, महिलांनाही पूर्ण स्वातंत्र्य देण्याची योजना

Sep 23, 2024 01:48 PM IST

new muslim country like vatican city : व्हॅटिकन सिटीच्या धर्तीवर नवा मुस्लिम देश तयार केला जाणार आहे. या साठी एका मुस्लिम मौलवीने प्रयत्न सुरू केले आहेत. बाबा मोंडी असे या मौलवीचे नाव आहे.

व्हॅटिकनच्या धर्तीवर स्वतंत्र मुस्लिम देश बनवणार, महिलांनाही पूर्ण स्वातंत्र्य देण्याची योजना
व्हॅटिकनच्या धर्तीवर स्वतंत्र मुस्लिम देश बनवणार, महिलांनाही पूर्ण स्वातंत्र्य देण्याची योजना

new muslim country like vatican city : व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश मानला जातो. या देशात ख्रिस्ती धर्माचे वरिष्ठ धर्मगुरु पोप राहतात. येथूनच जगभरातील ख्रिस्ती धर्मियांना ते मार्गदर्शन करत असतात व विविध गोष्टींवर ते भाष्य करत असतात. व्हॅटिकन सिटी प्रमाणेच मुस्लिमांसाठी या प्रकारचा देश तयार करण्याचे प्रयत्न केला मौलवीने सुरू केले आहेत. या देशातून मुस्लिमांना विविध अधिकार असतील. हा देश अल्बेनियाची राजधानी तिराना येथे तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास हा जगातील सर्वात लहान देश असेल. या शहराचे क्षेत्रफळ न्यूयॉर्क शहरापेक्षाही कमी असेल. या देशात दारू पिणे देखील वर्ज नसेल तसेच महिलांनाही हवे ते घालण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच त्यांच्यावर जीवनशैलीवर कोणतेही बंधन राहणार नाही

तिराना नावाचा वेगळा देश निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे मौलवी एडमंड ब्राह्मीमाज म्हणतात की, देवाने कशावरही बंदी घातली नाही. त्यामुळे आपण काय करावं ही ठरवण्यासाठी आपल्याला मेंदू दिला आहे. बाबा मोंडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या एडमंडचे यांचं म्हणणं आहे की, फक्त २७ एकरांवर हा देश तयार केला जाईल. या देशाला मान्यता देण्यास अल्बानिया तयार आहे. या देशात स्वतःचे प्रशासन असेल, सीमा निश्चित केल्या जातील आणि लोकांना पासपोर्टही दिले जातील. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनीही अशा देशाबाबत घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. हा देश इस्लामच्या सुफी परंपरेशी संबंधित बेक्ताशी आदेशाचे नियम पाळणार आहे.

बेक्ताशी ऑर्डरची सुरुवात ही १३ व्या शतकात ऑट्टोमन साम्राज्याच्या काळात झाली. सध्या बेक्ताशी ऑर्डरचे प्रमुख बाबा मोंडी आहेत, जे ६५ वर्षांचे आहेत आणि त्यांनी यापूर्वी अल्बेनियन सैन्यातही सेवा केली आहे. जगातील लाखो मुस्लिमांमध्ये ते परिचित आहेत. त्यांना हाजी देडे बाबा म्हणूनही ओळखले जाते. बेक्ताशी ऑर्डर शिया सूफी पंथाशी संबंधित आहे. ज्याची मुळे १३व्या शतकात तुर्कियेमध्ये आढळतात. परंतु आता हा समुदाय अल्बेनियामध्ये स्थाईक झाला आहे. इस्लामचा उदारमतवादी चेहरा जगासमोर यावा यासाठी आम्ही नवीन मुस्लिम राज्य निर्माण करत आहोत, असे अल्बानियाचे पीएम एडी रामा यांनी म्हटले आहे. असे झाल्यास याचा आम्हाला अभिमान वाटेल.

एडी रामा म्हणाले की आपण या वारश्याचे रक्षण केले पाहिजे. या द्वारे धार्मिक सहिष्णुता राखली जाईल. रामा म्हणाले की, आम्ही जो नवा देश निर्माण करणार आहोत तो पूर्व तिरानामध्ये असेल. त्याचा आकार व्हॅटिकन सिटीच्या एक चतुर्थांश असेल. या देशात लोकांवर कोणतेही बंधन राहणार नाही आणि त्यांना त्यांचे जीवन त्यांच्या पद्धतीने जगण्याची संधी मिळेल. बाबा मोंडी म्हणतात की देव आपल्यावर कोणतीही बंधने लादत नाही असा आमचा विश्वास आहे. म्हणूनच त्याने आपल्याला मेंदू दिला आहे जेणेकरून आपण आपल्या विवेकबुद्धीने आपल्यासाठी काय चूक आणि काय योग्य ते ठरवू शकतो.

Whats_app_banner
विभाग