New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभात जाण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे दिल्ली स्थानकात चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १८ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक नागरिक जखमी झाले. यात अनेक मुलांचा देखील सहभाग आहे. रेल्वे बोर्डाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दिल्लीतील मुख्य रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रणात अपयशी ठरल्याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभात जाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक विनातिकीट प्लॅटफॉर्मवर पोहोचले होते. त्यांना थांबवले देखील जात नव्हते. तेवढ्यात रोखलेही जात नव्हते. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली.
दिल्लीतील कापशेरा येथील एका रहिवाशाने सांगितले की, पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यात प्लॅटफॉर्म बदलीची घोषणा झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. नागरिक दुसऱ्या प्लॅटफॉर्म जाण्यासाठी वळल्यावर अचानक चेंगराचेंगरी झाली. याच वेळी आणखी एक रेल्वे आल्याने मोठा गोंधळ उडाला. लोक एकमेकांच्या अंगावरून उड्या मारून जात होते.
इतर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी विनातिकीट प्लॅटफॉर्मवर पोहोचले. महाकुंभासाठी रेल्वेने दुपारी १२.३० वाजता विशेष रेल्वेही जाणार होती. अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांना या रेल्वेने प्रयागराजला जायचं होतं. प्रवाशांना तिकीट खरेदी करायचे होते, पण सर्व गाड्यांच्या तिकिटांची मर्यादा संपुष्टात आली होती. त्यामुळे अनेकांनी तिकीट न काढताच प्लॅटफॉर्मवर गेले. व गाडीत बसण्यास सुरुवात केली. बहुतांश लोकांच्या म्हणण्यानुसार, जमाव रेल्वे स्थानकात घुसला आणि त्यांना कोणी नियंत्रित करण्यासाठी कोणती यंत्रणा देखील नव्हती.
प्रवासी हे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात असतांना गाडीच्या प्लॅटफॉर्म बदलाची पुन्हा घोषणा झाली. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना वारंवार पायऱ्या चढून गर्दीत जाणे अवघड होऊन बसले. प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाल्यानंतरही अचानक पुन्हा प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा जीवघेणी ठरली. प्लॅटफॉर्मवर इतकी गर्दी होती की पादचारी पुलावर नागरिकांनी अक्षरक्ष: एकमेकांना चिरडले व पुढे गेले. एनडीआरएफचे जवानही तेथे उपस्थित होते. सणासुदीच्या काळातही एवढी गर्दी होत नाही. एका विक्रेत्याने प्लॅटफॉर्म बदलला नसून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रवाशांमद्धे गोंधळ उडल्याने ही दुर्घटना घडली.
ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. अचानक नागरिक मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही गर्दी पोलिसांना हाताळता आली नाही. प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी होती. पण पादचारी पुलावर खूप गर्दी झाली होती. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, रात्री १० वाजून १० मिनिटांनी प्रयाग स्पेशल ट्रेन होती. ही गाडी पकडण्यासाठी आम्ही पादचारी पूलावरून खाली उतरत होतो तेवढ्यात ही दुर्घटना घडली.
संबंधित बातम्या