इनक्युबेटरमध्ये नवजात बाळाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना झारखंड राज्यातील सदर रुग्णालयातील स्पेशल न्यूबॉर्न केअर यूनिट (एसएनसीयू) मध्ये घडली. बाळाला चांगल्या उपचारासाठी येथे दाखल करून इनक्यूबेटरमध्ये ठेवले होते. मात्र तेथे जळून त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी आरोप केला आहे की, आपला मृत्यू लपवण्यासाठी नर्सने बाळाला कपड्यात गुंडाळून व ऑक्सिजन लावून रिम्स रेफर केला.
बाळाचे वडील आनंद मसीह लकडा बाळाला घेऊन सकाळी रिम्समध्ये पोहोचले तेव्हा डॉक्टरांना बाळाला पाहून धक्का बसला. रिम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, बाळाचा रात्रीच मृत्यू झाला आहे. याबाबत सरकारी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आनंद यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, १३ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी निरीली टोप्पो यांची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला होता. बाळ व बाळंतीन सुखरुप होते. रात्री सव्वा आठ वाजता बाळाच्या हृदयाचे ठोके कमी असल्याचे सांगून त्याला एसएनसीयूमध्ये दाखल केले गेले. त्यानंतर रुग्णालयाने काहीच सांगितले नाही. सकाळी पाच वाजता नर्सने बोलावून सांगितले की, बाळाची प्रकृती खुपच खालावली असून त्याला रिम्समध्ये दाखल करा. आनंद यांनी सांगितले की, २३ फेब्रुवारी रोजी त्यांनी सदर रुग्णालयाच्या प्रशासनाकडे याची तक्रार केली होती. मात्र अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. आज (गुरुवार) सिव्हिल सर्जनकडे तक्रार केली.
रिम्समधील पेड्रियाटिक सर्जन डॉ. अभिषेक रंजन यांनी सांगितले की, बाळाच्या आईप्रमाणे असते इनक्यूबेटर. यामध्ये बाळाच्या सुरक्षेचे सर्व उपाय केलेले असतात. ९९ टक्के गँरेंटी आहे की, यामध्ये बाळाला काहीही होत नाही. जर एक टक्केही शंका असेल तर ऑटोप्सी करावी लागेल.
संबंधित बातम्या