मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Attack on Israel : राफावर हल्ल्याआधी इस्लामिक संघटनेने इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; युद्ध आणखी भडकणार

Attack on Israel : राफावर हल्ल्याआधी इस्लामिक संघटनेने इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र; युद्ध आणखी भडकणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 12, 2024 04:58 PM IST

New Attack in Israel : इस्रायलवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला करण्यात आला आहे. राफावरील इस्रायल लष्कराच्या हल्ल्यापूर्वी इराकमधील शिया इस्लामिक संघटनेने इस्रायलवर हा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून पॅलेस्टिनींची बाजू या संघटनेने घेतली आहे.

इस्रायलवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला करण्यात आला आहे. राफावरील इस्रायल लष्कराच्या हल्ल्यापूर्वी इराकमधील शिया इस्लामिक संघटनेने इस्रायलवर हा हवाई हल्ला केला आहे.
इस्रायलवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला करण्यात आला आहे. राफावरील इस्रायल लष्कराच्या हल्ल्यापूर्वी इराकमधील शिया इस्लामिक संघटनेने इस्रायलवर हा हवाई हल्ला केला आहे.

New Attack in Israel : गाझामधील राफा शहर रिकामे करण्यास इस्रायलने येथील नागरिकांना सांगितले आहे. राफावर हल्ला करण्यावरून जग दोन विभागले गेले आहे. एकीकडे अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक पाश्चिमात्य देश इस्रायलला पाठिंबा देताना दिसत आहेत. तर त्याचवेळी मुस्लिम देशांनी पॅलेस्टिनींना पाठिंबा देत इस्रायलचा विरोध सुरू केला आहे. त्यातच इस्रायलचा रफाहवरील हल्ल्यापूर्वीच इराकमधील शिया इस्लामिक संघटनेने इस्रायलच्या लष्करी विमानतळावर क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. या हल्ल्याची जबाबदारीही या संघटनेने स्वीकारली आहे. पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ त्यांनी हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. मात्र, या घटनेमुळे या क्षेत्रात युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral news: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या जेवणात मिसळत होता प्रायव्हेट पार्ट अन् करत होता लघवी! वेटरचे घाणेरडे कृत्य

दक्षिण गाझामधील राफा शहराच्या सीमेवर इस्रायलचे सैन्य मोठ्या संख्येने तैनात आहेत. या ठिकाणी इस्रायलचे टँक देखील तैनात आहेत. इस्रायली सैन्य कधीही रफाहवर हल्ले करू शकतात. या साठी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आदेशाची लष्कर वाट पाहत आहेत. मात्र, राफावरील हल्ल्याव्यतिरिक्त इस्रायली लष्कराने गाझामध्ये देखील हल्ले सुरूच ठेवले आहेत. राफा हल्ल्यापूर्वी अमेरिकेने इस्रायलच्या वतीने हमासला युद्धविराम करण्याबाबत आवाहन केले आहे. इस्रायल राफावर हल्ला करण्याच्या तयारीत असतांना इस्रायलवर इराकमधील इस्लामिक संघटनेने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

Pune Lokasbha Election : पुणे जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान! सात हजार पोलिस तैनात, ईव्हीएमचे वितरण

इराकमधील इस्लामिक प्रतिकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलिशियाच्या एका गटाने शनिवारी एका ऑनलाइन निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या सैनिकांनी पहाटे दक्षिण इस्रायलमधील रॅमन हवाई तळावर लांब पल्ल्याच्या अल-अरकाब प्रगत क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून शिया संघटनेने पॅलेस्टिनींप्रती त्यांची बांधिलकी व्यक्त केली. इस्त्रायली सैन्य गाझामध्ये जे काही करत आहे त्याचा हा बदला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

गाझा पट्टीतील लोकांशी त्यांची बांधिलकी असून इस्रायलने जर हल्ले थांबवले नाही तर आणखी हल्ले करण्याची धमकी इस्लामिक संघटनेने दिली आहे. उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी गांजावरील हल्ले सुरू झाल्यापासून इराकच्या या इस्लामिक संघटनेने इस्रायल आणि अमेरिकन लक्ष्यांवर अनेकवेळा हल्ले केले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग