मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Patanjali Toothpaste : पतंजलीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ?, कंपनीला कायदेशीर नोटीस

Patanjali Toothpaste : पतंजलीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ?, कंपनीला कायदेशीर नोटीस

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 19, 2023 03:45 PM IST

Patanjali Toothpaste Ingredients : पतंजलीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ असल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी बाबा रामदेव यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Yoga Guru Baba Ramdev
Yoga Guru Baba Ramdev (Amit Sharma)

Patanjali Toothpaste Ingredients : आयुर्वेदीक औषधांपासून उत्पादनं तयार करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली कंपनीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थाचा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वकील शाशा जैन यांनी या प्रकरणात पतंजली कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आता हे प्रकरण समोर येताच अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत बाबा रामदेव यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पतंजली कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतंजली कंपनी टूथपेस्ट दिव्या दंत मंजन हे पूर्णपणे शाकाहारी असल्याचं सांगत ग्राहकांना मांसाहाराचा समावेश असलेलं उत्पादन विकत असल्याचंही तक्रारदार वकिलांकडून सांगण्यात आलं आहे.

पतंजलीच्या दंत कांती टूथपेस्टमध्ये कटलफिश या माशाची हाडं आणि मांस वापरण्यात आल्याचा दावा वकील शाशा जैन यांनी केला आहे. त्यांनी पतंजली कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून या प्रकरणावर स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यानंतर आता अनेकांनी पत्र शेयर करत ग्रीन लेबल लावून पतंजली मांसाहारी पदार्थ असलेले उत्पादने कशी काय विकू शकते?, असा सवाल केला आहे.

शाशा जैन यांनी पतंजलीला पाठवलेली नोटीस शेयर करत म्हटलं आहे की, कंपनी शाकाहारी असल्याचं सांगत एखादं उत्पादन बाजारात आणतं तेव्हा त्यात मांसाहारी पदार्थांचा समावेश करणं हे ग्राहकांच्या हक्कांचं उल्लघन आहे. याशिवाय हे असंख्य लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारा धक्कादायक प्रकार आहे, असं जैन यांनी म्हटलं आहे.

पतंजलीचं स्पष्टीकरण येईपर्यंत मला कंपनीच्या उत्पादनांबाबत संशय आहे. जैन यांनी कंपनीला पाठवलेल्या नोटीशीला १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यावर कंपनीने स्पष्टीकरण न दिल्यास पतंजली कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही शाशा जैन यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता पतंजली कंपनी आणि बाबा रामदेव यांच्याविरोधात संताप व्यक्त करत अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

IPL_Entry_Point