Utrecht’s World’s First Cycling Desk Library: नेदरलँडमध्ये सायकल चालवणे ही सर्वसामान्य बाब आहे. येथील नागरिक आरोग्यासाठी सायकल चालवण्याला प्राधान्य देतात. येथील उट्रेच शहर सायकलींचे शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक भन्नाट प्रयोग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांमध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी येथील लायब्ररीत सायकल डेस्क तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी सायकल चालवून आता मोबाइल देखील रीचार्ज करता येणार आहे. वाचण्याचा आनंद घेत नागरिक आरोग्याची काळजी घेणार असून फ्री एनर्जीने मोबाइल देखील चार्ज करू शकणार आहेत.
जगात सुंदर देशांमध्ये नेदरलँडचा क्रमांक लागतो. येथील उट्रेच शहर हे जगातील सुंदर शहरांपैकी एक आहे. हे शहर राजधानी ॲमस्टरडॅमच्या आग्नेयेस सुमारे ३५ किमी अंतरावर आहे. या शहराला सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते. साधारणतः ९० हजार नागरिक रोज सायकलींचा वापर करून नोकरीच्या ठिकाणी किंवा शाळांमध्ये जात असतात.
उट्रेचमध्ये नगरिकांच्या आरोग्यासाठी आता एक भन्नाट उपक्रम राबवण्यात येत आहेत. येथील एका लायब्ररी नागरिक वाचनासोबतच सायकलिंग करण्याचा आनंद घेऊ शकतात. एवढेच नाही तर या माध्यमातून तयार होणाऱ्या फ्री एनर्जीवर ते त्यांचा मोबाइल व इतर ईलेक्ट्रॉनिक यंत्रे देखील चार्ज करू शकता. या उपक्रमातून अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी शहराने महत्वाचे पाऊल उचलले आहे. अशा प्रकारचा प्रयोग राबवणारे उट्रेच शहर जगातील पहिले शहर ठरले आहे.
या शहरात अक्षय उर्जेला चालना देणीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले आहे. येथील नागरिकांनी गॅस कुकर वापरणे बंद केले आहे. त्या ऐवजी सौर उर्जेचा वापर करण्यात येत आहे. अशा प्रकारचे पाऊल उचणारे ते जगातील पहिले शहर ठरले आहे.
उट्रेचमध्ये एक लायब्ररी तयार करण्यात आली असून या ठिकाणी सायकल डेस्क तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिक सायकल चालवून वाचण्याचा आनंद घेऊ शकतात. त्यांच्या सायकल चालवण्यातून विद्युत निर्मिती देखील केली जात आहे. या उर्जेवर लायब्ररीत येणारे नागरिक त्यांचा फोन व इतर ईलेक्ट्रॉनिक यंत्रे चार्ज करू शकतात. या माध्यमातून पर्यावरन रक्षणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल या शहराने पुढे टाकले आहे.
या प्रकारच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत केली आहे. सायकलींगच्या माध्यमातून ऊर्जा तयार करून नागरिक त्याचा वापर दैनंदीन जीवनात करत आहेत. यामुळे वेळ, श्रम यांची बचत होऊन नागरिकांचे आरोग्य देखील चांगले राहत आहे.
संबंधित बातम्या