Netyanahu house was targeted again : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर पुन्हा एकदा हल्ला झाला झाला आहे. या हल्यात बेंनामिन नेतन्याहू हे थोडक्यात बचावले आहेत. हिजबुल्लाहने डागलेले दोन रॉकेट त्याच्या घराजवळील सिझेरियात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने शुक्रवारी लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने दोन रॉकेट डागले. दोन्ही रॉकेट नेतन्याहू यांच्या घराच्या बागेत कोसळले. या हल्ल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. या घटनेनंतर इस्रायलच्या लष्कराने तात्काळ या भागाची सुरक्षा वाढवली आणि या हल्ल्याचा तपास सुरू केला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. इस्रायलने हिजबूल्लावरील हल्ले तीव्र केले आहे. तर हिजबूल्लाने देखील इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले वाढवले आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये दोन्ही देशांमध्ये सीमेवर अनेक वेळा संघर्ष झाला आहे. हल्ल्यांची ही ताजी मालिका आहे. इस्रायलने या हल्ल्याला गंभीर इशारा म्हणून घेतले असून त्याचे परिमाण हिजबुल्लाहला भोगावे लागतील, असा गंभीर इशारा दिला आहे.
हल्ल्याच्या वेळी नेतन्याहू आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. शिन बायत यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ परिसराला घेराव घातला आणि तपास सुरू केला.
इराणच्या भूमीवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याला इराण इस्रायलला चोख प्रत्युत्तर देईल, अशी ग्वाही इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. इरना या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. इराणमधील लष्करी तळांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या इराणी हवाई दलाच्या सदस्याच्या कुटुंबीयांसमवेत झालेल्या बैठकीत इराणच्या लष्कराचे कमांडर इन चीफ अब्दुलरहीम मौसावी यांनी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही हल्ल्याची वेळ आणि पद्धत ठरवत आहोत आणि गरज पडल्यास आम्ही हयगय न करता थेट हल्ला करणार, असे ते म्हणाले. आमच उत्तर हे चोख राहील असे इराणने म्हटलं आहे.
इराणने नुकत्याच केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणमधील अनेक लष्करी तळावर अचूक हवाई हल्ले केल्याची घोषणा इस्रायलच्या संरक्षण दलाने २६ ऑक्टोबर रोजी केली होती. इराणच्या हवाई संरक्षण मुख्यालयाने दावा केला आहे की त्यांनी इस्रायलच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले, यामुळे त्यांचे फारसे नुकसान झालेले नाही.