मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  al jazeera ban in israel:इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंची मोठी कारवाई

al jazeera ban in israel:इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंची मोठी कारवाई

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 06, 2024 01:23 PM IST

al jazeera ban in israel : इस्रायलने कतारच्या मालकीच्या 'अल जझीरा' या वृत्तवाहिनीवर इस्रायलमध्ये बंदी घातली आहे. वृत्तवाहिनीची सर्व कार्यालये बंद करण्यात आली आहेत. या बाबतचा निर्णय नेतन्याहू यांनी 'एक्स' वर जाहीर केला आहे.

इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंची मोठी कारवाई
इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंची मोठी कारवाई

al jazeera ban in israel : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी इस्रायलमधील कतारच्या मालकीचे असलेले अल जझीरा वृत्त वाहिनी बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. या वृत्तवाहिनीचे इस्रायलमधील सर्व कार्यालये बंद करण्यात येणार आहे. या बाबत नेतन्याहू यांनी 'एक्स' वर पोस्ट केली असून या बाबत निर्णय दिला आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायल आणि वृत्तवाहिनीतील वाद वाढला आहे. विशेष म्हणजे, गाझामधील युद्धासंदर्भात इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठी कतार पर्यंत करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

इस्रायलच्या मते अल जझीराला दहशतवादी वृत्त वाहिनी

गेल्या महिन्यात इस्रायली संसदेने अल जझीरा वाहिनी बंद करण्या संदर्भात निर्णयांसाठी कायदे केले होते. कायदा झाल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलमध्ये या वृत्त वाहिनीचे कार्यालय बंद करण्यात असल्याचे जाहीर केले. ही वृत्तवाहिनी भडकावणारी व 'दहशतवादी' कारवायांना प्रोत्साहन देणारी आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Viral News : 'या' मुली बलात्कार करण्यास योग्य नाही! शाळेतील मुलांनी बनवलेली मुलींची यादी व्हायरल झाल्याने खळबळ

इस्रायलच्या या निर्णयाला प्रत्युत्तर देताना अल जझीराने नेतन्याहू यांच्या प्रक्षोभक भाषणाचा आणि त्यांच्या या वृत्तवाहिनी विरोधातील निर्णयाचा निषेध केला. त्यांनी केलेला आरोप अल जझीराने फेटाळून लावला आहे. तर त्यांच्या या दव्याला त्यांनी हास्यास्पद आणि खोटे म्हटले आहे. अल जझीराने एका निवेदनात म्हटले आहे की नेतन्याहू हे वृत्तवाहिनीचे कार्यालय आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहेत. चॅनेलच्या मते, त्यांचे पत्रकार त्यांचे धाडसी आणि व्यावसायिक वृत्तांकन हे सुरच ठेवणार आहेत. तसेच या विरोधात कायदेशील मार्ग देखील ते अवलंबवणार आहेत.

इस्रायल आणि अल जझीरा यांच्यात पूर्वीपासून वाद

इस्रायल आणि अल जझीरा वृत्त वाहिनीत पूर्वीपासून विविध मुद्यावरून वाद सुरू आहेत. इस्रायलने या वृत्तवाहिनीवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी इस्त्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये इस्रायली लष्करी हल्ल्यादरम्यान अल जझीराचे वार्ताहर शिरीन अबू अक्लेह यांचा मृत्यू झाल्यानंतर दोघांमधील वाद आणखी वाढला आहे. अल जझीरा हे आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसेसपैकी एक आहे. या वृत्तवाहिनीने संपूर्ण युद्धात गाझामधून वृत्तांकन केले आहे. तसेच हवाई हल्ल्यांचे रक्तरंजित दृश्ये आणि रुग्णालयांचे थेट प्रक्षेपण देखील कील आहे. त्यांनी इस्रायलवर नरसंहाराचा आरोप देखील केला आहे. इस्रायलने अल जझीराचे हमाससोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे.

IPL_Entry_Point