मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Netaji Jayanti: संघर्षाची प्रेरणा देतील सुभाषचंद्र बोस यांचे 'हे' अनमोल विचार

Netaji Jayanti: संघर्षाची प्रेरणा देतील सुभाषचंद्र बोस यांचे 'हे' अनमोल विचार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 22, 2024 11:20 PM IST

Subhas Chandra Bose inspirational quotes: सुभाषचंद्र बोस यांचे हे विचार अनेकांना प्रेरणा देतील.

Netaji Subhas Chandra Bose
Netaji Subhas Chandra Bose

Subhas Chandra Bose Birth Anniversary: भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. दरवर्षी २३ जानेवारीला मोठ्या उत्साहाने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते. सुभाष चंद्र यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिसाच्या कटक येथे बंगाली कुटुंबात झाला. 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा..!' सुभाष चंद्र बोस यांचा हा नारा आजही भारतीयांच्या हृदयात आहे. सुभाष चंद्र बोस यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौजची स्थापना केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. आजच्या या परिस्थितीत त्यांचे विचार अनेकांना ताकद देऊ शकतील.

Republic Day 2024: या प्रजासत्ताक दिनी, मुलांना २६ जानेवारीचे महत्त्व या प्रकारे शिकवा!

सुभाष चंद्र बोस यांचे विचार

- यशाचा मार्ग दूर असतो परंतु तो निश्चित पूर्ण होतो. यामुळे आपण निरंतर पुढे चालत राहावे.

- वेळेपुर्वीची प‍रिपक्‍वता चांगली नसते, मग ती एखाद्या वृक्षाची असो वा व्यक्तीची, त्याचे नुकसान भविष्यात भोगावेच लागते.

- सुभाषचंद्र बोस नेहमी सांगायचे, 'मी जीवनात कधीही कोणाच्याही पुढेपुढे केले नाही. इतरांना चांगले वाटेल अशा गोष्टी बोलणे मला येत नाही.'

- जे लोक फुलांना पाहून लगेच उत्साहित होतात त्यांना काटेही लवकर टोचतात.

- जर संघर्ष नसेल, कोणाचेही भय नसेल तर, जीवनाची अर्धी चव नष्ट होते.

- सर्वात मोठा गुन्हा अन्याय सहन करणे आणि चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणे आहे.

- सुभाषचंद्र बोस नेहमी सांगायचे, 'मी जीवनात कधीही कोणाच्याही पुढेपुढे केले नाही. इतरांना चांगले वाटेल अशा गोष्टी बोलणे मला येत नाही.'

- आपल्याला आपल्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास असणे आवश्यक आहे कारण उधार घेतलेली ताकद आपल्यासाठी घातक ठरते.

-उच्च विचारांनी दुर्बलता दूर होते, यामुळे आपण आपल्या हृदयात उच्च विचार निर्माण करत राहावे.

WhatsApp channel

विभाग