Nepal Plane Crash Video: ते शेवटचे काही सेकंद.. नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nepal Plane Crash Video: ते शेवटचे काही सेकंद.. नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर

Nepal Plane Crash Video: ते शेवटचे काही सेकंद.. नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर

Updated Jul 24, 2024 04:27 PM IST

Nepal Plane Crash Video: विमानाने रनवे वरून हवेत झेप घेतली. तोपर्यंत सर्वकाळी सुरळित सुरू होते. मात्र हवेत झेपावताच काही मिनिटातच विमानाचे संतुलन बिघडले व विमान हेलकावे खाऊ लागले.

नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर
नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर

Nepal Plane Crash Video : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमानाचा भीषण अपघात झाला आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विनानतळावर एक विमान उड्डाण करताना कोसळले व त्याला आग लागली. या अपघातात वैमानिकासह १८ जणांचा मृत्यू झाला. विमानात १९ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हे पाहून समजते की, अपघात किती भीषण होता. व्हिडिओमध्ये दिसते की, विमानाचे संतूलन बिघडले व टेकऑफ करताच जमिनीवर कोसळले.

जमिनीवर कोसळताच लागली आग -

विमानाने त्रिभुवन एअरपोर्टवरून उड्डाण केले होते. हे विमान काठमांडूहून पोखराकडे जात होता. शौर्य एअरलायन्स (Saurya Airlines)च्या या विमानात १९ प्रवासी प्रवास करत होते. विमानाने रनवे वरून हवेत झेप घेतली. तोपर्यंत सर्वकाळी सुरळित सुरू होते. मात्र हवेत झेपावताच काही मिनिटातच विमानाचे संतुलन बिघडले व विमान हेलकावे खाऊ लागले. व्हिडिओमध्ये दिसते की, विमान एका बाजुला झुकले होता. विमान डावीकडे झुकल्यानंतर काही सेकंदातच विमान रनवेपासून काही अंतरावर विमान कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाला आग लागली व धुराचे लोळ एअरपोर्टपर्यंत आले. आग इतकी भयावह होती की, यामध्ये विमानातील सर्व लोकांचा होरपळून मृत्यू झाला.

विमान दुरुस्तीसाठी जात होते -

अपघातानंतर खुलासा झाला आहे की, शौर्य एअरलायन्सचे अपघातग्रस्त विमान इंजिनच्या तपासणीसाठी पोखराकडे जात होते. जहाज पूर्ण इंजन ओवरहाल (सी-चेक) साठी पोखराकडे जात होते. या विमानात ९ एन-एएमई मध्ये १९ लोक प्रवास करत होते. नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमानात सर्व लोकइंजीनियर आणि तांत्रिक होते. हे विमान एक महिना पोखरा येथील हँगरमध्ये ठेवण्यात येणार होते.

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले की, ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. शौर्य एअरलायन्सचे विमान पोखरा जाणाऱ्या विमानाने उड्डाण करताच दुर्घटनाग्रस्त झाले. नेपाळ पोलीस आणि नेपाळी लष्करासह अग्निशमन दल आणि सुरक्षा दलाकडून बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचे कॅप्टन मनीष शाक्य यांना विमानाच्या ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले आहे. त्यांना उपचारासाठी सिनामंगल येथील केएमसी रुग्णालयात दाखल केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर