मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Panipuri Ban : पाणीपुरी लव्हर्सला धक्का; जगातील ‘या’ देशात पाणीपुरी विक्रीवर बंदी
Panipuri Ban In Nepal
Panipuri Ban In Nepal (HT)

Panipuri Ban : पाणीपुरी लव्हर्सला धक्का; जगातील ‘या’ देशात पाणीपुरी विक्रीवर बंदी

24 November 2022, 15:50 ISTAtik Sikandar Shaikh

Panipuri Ban : पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी अनेक लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. परंतु जगातील एका देशानं पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Panipuri Ban In Nepal : पाणीपुरी खाणं अनेक लोकांसाठी जीव की प्राण असतो. काही लोकांना दिवसांतून अनेकवेळा पाणीपुरी खाणं आवडतं. उत्तर भारतापासून तर मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी चविष्ट पाणीपुरी लोकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. परंतु आता भारतात लोकप्रिय असलेल्या पाणीपुरीवर जगातील एका देशानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता यावरून सोशल मीडियावर त्यावरून अनेक लोकांनी प्रतिक्रिया देत या निर्णयावर टीका केली आहे. भारताचा शेजारी असलेल्या नेपाळ सरकारनं पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता नेपाळमधील पाणीपुरी लव्हर्सला मोठा धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

समोर आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया वेबसाईट असलेल्या क्योरावर काही लोकांनी पाणीपुरीवर कोणत्या देशात बंदी घालण्यात आली आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी जितेंद्र बाथम या युजरनं प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं आहे की, पाणीपुरी ही नेहमी उघड्यावर बनवली जाते. त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं आणि स्टॉलवर स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्यानं ते आरोग्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता असते.

पाणीपुरीच्या सेवनानं त्यातील बॅक्टिरियांचा शरिरात प्रवेश होऊ नये म्हणून नेपाळ सरकारनं पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घातल्याचं म्हटलं आहे. याशिवाय कॉलरा या आजारासाठी कारणीभूत ठरणारे घटक पाणीपुरीत आढळून आल्याचंही कारण केरळ सरकारनं दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नेपाळची राजधानी काठमांडूत हॅजा या आजाराचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. त्यामुळं नेपाळच्या आरोग्यमंत्रालयानं लोकांना पाणीपुरीचं सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार, वैद्यकीय तपासणी करण्याच्याही सूचना नेपाळ सरकारनं लोकांना केल्या आहेत.

विभाग