मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Aircraft Crashes: मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये ७२ जणांसह विमान धावपट्टीवर कोसळलं, बचावकार्य सुरू
Nepal Plane With 72 On Board Crashes On Runway
Nepal Plane With 72 On Board Crashes On Runway

Aircraft Crashes: मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये ७२ जणांसह विमान धावपट्टीवर कोसळलं, बचावकार्य सुरू

15 January 2023, 12:17 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Aircraft Crashes In Nepal: नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ जणांसह विमान धावपट्टीवर कोसळलं. या दुर्घटनेत मोठी जिवीतहानी झाल्याची भिती व्यक्त केली जात असून बचावकार्य सुरू आहे.

Nepal Plane With 72 On Board Crashes On Runway: नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ जणांसह विमान धावपट्टीवर कोसळल्याची मोठी दुर्घटना घडलीय. घटनास्थळी हेलिकॉप्टर बचाव पथक तैनात झालं असून बचावकार्याला सुरुवात झालीय. या दुर्घटनेबाबत एएनआय वृत्तसंस्थेनं माहिती दिलीय. सध्या सोशल मीडियावर या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात दुर्घटनाग्रस्त स्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. या दुर्घटनेत मोठी जिवीतहानी झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एएनआयचे ट्वीट-

दुर्घटनाग्रस्त विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, अशी माहिती यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी दिलीय. 

विभाग