Nepal Aircraft Crashes Updates: नेपाळ विमान दुर्घटनेत १६ जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Plane Crashes In Nepal: नेपाळमध्ये आज सकाळी विमान धावपट्टीवर कोसळल्यानं मोठी जीवितहानी झाली. या विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते. यापैकी १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Pokhara International Airport: नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मोठी जिवीतहानी झाली. अपघातस्थळावरून आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. विमानात काही भारतीयांसह १० परदेशी नागरिक असल्याची माहिती समोर आलीय. सध्या याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
ट्रेंडिंग न्यूज
यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झालाय. दुर्घटनाग्रस्त विमानात ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन, १ आयरिश, २ कोरियन, १ अर्जेंटीनी आणि १ फ्रेंच नागरिक होते, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेनं दिली आहे.
ट्वीट-
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, खराब हवामानामुळे विमातळाजवळ असलेल्या डोंगराला धडकून या विमानाचा अपघात झाला. या धडकेनंतर विमान विमानतळाजवळील नदीच्या किनारी आदळले. सध्या सोशल मीडियावर या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात दुर्घटनाग्रस्त स्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्यात मुस्तांगच्या थासांग येथील सनो स्वारे भीर येथील डोंगरावर तारा एअरचे विमान कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला होता. या विमानात तीन क्रू आणि चार भारतीय आणि दोन जर्मन नागरिकांसह १६ नेपाळी होते.