मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NEET मध्ये ०.००१ टक्के जरी गैरप्रकार आढळला तर...! सुप्रीम कोर्टाने ने NTAला उत्तर मागत फटकारलं

NEET मध्ये ०.००१ टक्के जरी गैरप्रकार आढळला तर...! सुप्रीम कोर्टाने ने NTAला उत्तर मागत फटकारलं

Jun 18, 2024 01:18 PM IST

NEET UG Supreme Court hearing : नीट यूजी परीक्षेशी संबंधित प्रकरणावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर या प्रकरणात ०.००१ टक्का जरी गैरकारभार आढळला तर त्याच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल.

NEET मध्ये ०.००१ टक्के जरी गैरप्रकार आढळला तर...! सुप्रीम कोर्टाने ने NTAला उत्तर मागत फटकारलं
NEET मध्ये ०.००१ टक्के जरी गैरप्रकार आढळला तर...! सुप्रीम कोर्टाने ने NTAला उत्तर मागत फटकारलं

NEET UG Supreme Court hearing : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच NEET UG 2024 च्या परीक्षेतील कथित पेपर लीक व गैरप्रकारांशी संबंधित याचिकांवर उत्तर मागवले आहे. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, "जर एखाद्याच्या बाजूने या प्रकरणी ०.००१ टक्का जारी गैरकारभार किंवा निष्काळजीपणा आढळला तर त्याच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल. कारण देशातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत विसरता येणार नाही. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एनटीएला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाकडून वेळेवर कारवाईची अपेक्षा आहे. तर या प्रकरणी “आम्ही ८ जुलै रोजी याचिकांवर सुनावणी करू, असे देखील ते म्हणाले.

नीट परीक्षेच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत वकील दिनेश-जोटवानी म्हणाले, 'आम्ही एनव्ही सरांच्या संस्थेच्या वतीने न्यायालयात आमची बाजू मांडली. या याचिकेत २० हजारांहून अधिक मुलांच्या सहया आहेत. हे सर्व विद्यार्थी आमच्या सोबत आहेत. आम्ही न्यायालयासमोर विवादित प्रश्नाचे गुण (क्रमांक २८) असे अनेक मुद्दे मांडले आहेत ज्याची दोन उत्तरे होती. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली व एनटीएला सांगितले की या मुद्द्यावर न्यायालयाला सहकार्य करावे. दरम्यान, हा मोठा गैर प्रकार असून अशा चुकीच्या पद्धतीने जर भविष्यातील डॉक्टर तयार होत असतील तर हे संपूर्ण देशाचे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यापूर्वी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी सांगितले होते की नीट मध्ये काही केंद्रांवर तफावत आढळून आली आहे. या गैरप्रकारात जे कुणी दोषी असतील मग एनटीएचे अधिकारी का असेनात त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रवेश पूर्व परीक्षेच्या प्रक्रियेतील अनेक दोष दूर करण्याचे काम देखील केले जाईल. नीट सारखी महत्त्वाची परीक्षा ही १०० टक्के पारदर्शक व्हायला हवी व यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

८ जुलै रोजी होणार महत्त्वाची सुनावणी

NEET-UG 2024 मधील अनियमिततेच्या आरोपांबाबत CBI तपासाची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे. वादग्रस्त एनईईटी यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकरांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, एनटीए आणि इतरांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. याशिवाय, NEET-UG वादावरील विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची विनंती करणाऱ्या NTA च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी खाजगी पक्षांना नोटीस बजावली. या प्रकरणावरही ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णयाच्या अधीन राहतील

एनटीएने वाढीव गुण रद्द केल्याने, ग्रेस गुणांसंबंधी असलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्यात आले. पण पेपर फुटल्याचा आरोप करत अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आणि देशातील विविध उच्च न्यायालयात याचिका दाखल करून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले की, यशस्वी उमेदवारांचे प्रवेश परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांवर अंतिम निर्णयाच्या अधीन असतील. परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

एनईईटीसंदर्भातील आरोप पाहता, एनटीए या परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेची प्रतिष्ठा वाचवणे व एनईईटीसह इतर परीक्षांच्या पारदर्शकतेबद्दल निर्माण झालेल्या शंका दूर करणे हे शिक्षणमंत्र्यांसमोर मोठे आव्हान राहणार आहे. याशिवाय नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत सुधारणा सुरू ठेवण्यासाठीही कटिबद्धता दाखवावी लागणार आहे. नीट परीक्षेबाबत काँग्रेसने ज्याप्रकारे गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे संसदेच्या अधिवेशनातही हा मुद्दा वादाचा ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर