मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NEET-UG Counselings Postponed : NEET-UG परीक्षेचे समुपदेशन स्थगित, सर्वोच्च न्यायालयात ८ जुलैला होणार सुनावणी

NEET-UG Counselings Postponed : NEET-UG परीक्षेचे समुपदेशन स्थगित, सर्वोच्च न्यायालयात ८ जुलैला होणार सुनावणी

Jul 06, 2024 01:54 PM IST

NEET-UG Counselings Postponed : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG समुपदेशन पुढे ढकलले आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

 NEET-UG परीक्षेचे समुपदेशन स्थगित, सर्वोच्च न्यायालयात ८ जुलैला होणार सुनावणी
NEET-UG परीक्षेचे समुपदेशन स्थगित, सर्वोच्च न्यायालयात ८ जुलैला होणार सुनावणी

NEET-UG Counselings Postponed : मेडिकल काउंसलिंग कमीशनने NEET UG परीक्षेबाबत समुपदेशन पुढे ढकलले आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहे. याआधी शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त NEET-UG २०२४ परीक्षेसाठीचे समुपदेशन पुढे ढकलण्यास नकार दिला होता. तसेच ही परीक्षा प्रक्रिया मनात येईल तेव्हा सुरू आणि बंद करता येणार नाही असे देखील कोर्टाने म्हटले होते. समुपदेशनाची प्रक्रिया आज ६ तारखेपासून सुरू होणार होती, मात्र, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

नीट यूजीसाठीचे समुपदेशन वैद्यकीय समुपदेशन आयोगाने म्हणजे MCC ने पुढे ढकलले आहे. समुपदेशनाची कोणतीही नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अखिल भारतीय कोट्यातील जागा म्हणजेच नीट यूजीचे एआयक्यु समुपदेशन आजपासून सुरू होणार होते, मात्र ते आता रद्द करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नीट यूजीतील रँकच्या आधारावर, एमबीबीएस आणि बीडीएस वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. दरम्यान, नीट परीक्षा पेपेयरफूटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ४ जून रोजी नीट युजी परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. यात ६७ टॉपर्ससह एकूण १३.१६ लाख विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर २३ जून रोजी ग्रेस गुण मिळालेल्या १५६३ उमेदवारांची देखील फेरपरीक्षा घेण्यात आली. सुधारित निकाल जाहीर झाल्यानंतर, नीट युजी टॉपर्सची संख्या ही ६७ वरून ६१ झाली आहे.

काय आहे नीट यूजी समुपदेशन प्रक्रिया ?

नीट यूजी समुपदेशन प्रक्रिया ही प्रामुख्याने पाच टप्प्यात होते. यात ऑनलाइन नोंदणी, पर्याय भरणे आणि लॉक करणे, सीट वाटप आणि शेवटी वाटप केलेल्या कॉलेजला अहवाल देणे या बाबींचा समावेश आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अनेक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते.

८ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

५ मे रोजी झालेल्या परीक्षेतील गैरप्रकार आणि परीक्षा नव्याने आयोजित करण्याच्या याचिकांसह संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालय ८ जुलै रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. पेपरफुटीसह विविध आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यासोबतच लोकसभेत देखील विरोधकांनी सरकारवर या प्रकरणी हल्लाबोल केला आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर