NEET PG Result 2024 declared : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नीट पीजी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एनबीईएमएसचे अधिकृत संकेतस्थळ natboard.edu.in वर जाऊन मुलांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. नीट पीजी २०२४ परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे वैयक्तिक गुणपत्रिका ३० ऑगस्ट २०२४ रोजी nbe.edu.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
एनबीईएमएसनं सांगितले की प्रश्नांची उत्तरे विषय तज्ञांकडून पूर्णपणे तपासली गेली आहेत आणि कोणताही प्रश्न तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आढळला नाही. अखिल भारतीय कोट्यातील ५० टक्के कोट्यातील जागांसाठी कट ऑफ स्वतंत्रपणे घोषित केला जाणार आहे. तर, राज्य कोट्यातील जागांसाठी अंतिम गुणवत्ता यादी/श्रेणीनिहाय यादी राज्ये/केंद्रशासित प्रदेश त्यांच्या गुणवत्ता/पात्रता निकष, लागू मार्गदर्शक तत्त्वे आणि आरक्षण धोरणानुसार तयार करण्यात येणार आहे. निकालात काही अडचण आल्यास उमेदवारांना ०११-४५५९३००० वर संपर्क साधून त्यांच्या अडचणी दूर करता येणार आहे.
नीट पीजी परीक्षा ११ ऑगस्ट २०२४ रोजी देशातील १८५ शहरांमध्ये दोन टप्प्यात घेण्यात आली. या परीक्षेत २ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मास्टर ऑफ सर्जरी, डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि पीजी डिप्लोमा प्रोग्रामसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षा एकापेक्षा जास्त टप्प्यात घेण्यात आल्याने निकाल सामान्यीकरण प्रक्रियेच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. नीट पीजी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना २६,१६८ डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी), १३,६४९ मास्टर ऑफ सर्जरी, ९९२ पीजी डिप्लोमा आणि १३३८ डीएनबी सीईटि जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.
सामान्य/इडब्ल्युएस : ५० वा पर्सेंटाइल
सामान्य - पीडब्ल्युबीडी ५० वा पर्सेंटाइल
एससी/एससी/एसटी/ओबीसी (अपंगांसह) ४०पर्सेंटाइल
आम्ही तुम्हाला सांगूया की गेल्या वर्षी MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET PG कट ऑफ जनरल आणि EWS साठी २९१ गुणांचा कट ऑफ होता. तर सामान्य कोट्यासाठी २७४ गुण, SC, ST, OBC (यामधील PWD सह. श्रेणी) कटऑफ हा २५७ गुणांचा होता.