मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NEET PG 2024 revised dates: नीट- पीजी परीक्षेच्या नव्या तारखा मंगळवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता

NEET PG 2024 revised dates: नीट- पीजी परीक्षेच्या नव्या तारखा मंगळवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता

Jun 29, 2024 09:21 PM IST

NEET PG 2024: इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

Union education minister Dharmendra Pradhan.
Union education minister Dharmendra Pradhan. (PTI)

Dharmendra Pradhan on NEET PG 2024: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2024 मधील अनियमितता आणि पेपर लीक झाल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सांगितले की, नीट पीजी 2024 च्या सुधारित तारखा 1 किंवा 2 जुलैपर्यंत जाहीर केल्या जातील. एनटीएला (National Testing Agency) आधीच नवीन नेतृत्व मिळाले आहे आणि इस्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली एजन्सीमध्ये सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांना दिली.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही नवा कायदा तयार केला असून संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. नीट-पीजीच्या नव्या तारखा सोमवार किंवा मंगळवारपर्यंत जाहीर केल्या जातील, असे प्रधान यांनी सांगितले. नीट परीक्षेच्या मुद्द्यावर संसदेत होणाऱ्या चर्चेपासून काँग्रेसला पळ काढायचा आहे, अशी टीकाही शिक्षणमंत्र्यांनी केली.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेसला चर्चा नको आहे आणि ते त्यापासून पळ काढत आहेत, असे प्रधान म्हणाले. त्यांना फक्त गोंधळ घालायचा आहे आणि संस्थात्मक यंत्रणेच्या संपूर्ण कामकाजात अडथळे निर्माण करायचे आहेत...' या प्रक्रियेतील आव्हाने आणि त्रुटी मान्य करून काँग्रेसला ज्या विषयावर चर्चा करायची आहे, त्या मुद्द्यावर खुद्द राष्ट्रपतींनीच लक्ष घातले आहे आणि आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे, सरकारच्या वतीने मी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत, परंतु, काँग्रेसला विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायचा नाही, त्यांना हे प्रकरण पेटलेले राहायचे आहे."

नीट यूजी २०२४ परीक्षा एनटीएने ५ मे रोजी आयोजित केली होती आणि सुमारे २४ लाख उमेदवार त्यास बसले होते. नीट यूजीचा निकाल १४ जून २०२४ रोजी जाहीर होण्याची शक्यता होती. परंतु, ४ जून रोजी लोकसभेच्या निकालाच्या दिवशी निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर बिहारसारख्या राज्यांमध्ये अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला होता, ज्याचा देशभरनिषेध करण्यात आला होता. नीट यूजी प्रकरणानंतर शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) आणि नीट (पदव्युत्तर) परीक्षा रद्द केल्या होत्या.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर