रविवारी (३० जून) रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मंत्रालयाकडून जारी निवेदनात म्हटले आहे की, काही स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहेत. या घटना लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मेडिकलसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून आयोजित एनईईटी-पीजी प्रवेश परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील प्रमुख प्रवेश परीक्षांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी रविवारी (२३ जून) होणारी नीट पीजी २०२४ परीक्षा पुढे ढकलली आहे. नीट पीजी ही देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले की, देशातील स्पर्धा परीक्षांच्या प्रामाणिकतेवर अलीकडेच झालेल्या आरोपांचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्रालय खेद व्यक्त करते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जूनमध्ये पुढे ढकलण्यात येणारी ही राष्ट्रीय पातळीवरील दुसरी प्रवेश परीक्षा आहे. सीएसआयआर-यूजीसी संयुक्त नेट अपरिहार्य परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी जाहीर केले होते.
या आठवड्याच्या सुरुवातीला, एनटीएद्वारे घेण्यात येणारी आणखी एक प्रवेश परीक्षा - यूजीसी नेट जून २०२४ - परीक्षेत गोंधळ झाल्याच्या संशयावरून रद्द करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी डार्कनेटवर पेपर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.
नेट आणि नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) टीकेच्या भोवऱ्यात सापडल्याने केंद्र सरकारने शनिवारी एनटीएच्या महासंचालकाची उचलबांगडी केली. १९८५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) अधिकारी प्रदीप सिंग खरोला हे सुबोधकुमार सिंह यांच्या जागी नियमित पदाधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त कार्यभार सांभाळून एजन्सीच्या प्रमुखपदी असतील.
संबंधित बातम्या
