मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 04, 2024 01:05 PM IST

NEET UG 2024 Dress Code, Guidelines : NEET परीक्षा उद्या होणार आहे. ही परीक्षा देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थी देणार आहेत. या परीक्षेसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. परीक्षा केंद्रांवर शूज आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्यास बंदी आहे. जाऊन घेऊयात परीक्षेची नियमावली.

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम
उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

NEET UG 2024 Dress Code, Guidelines : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) ही उद्या ५ मे रोजी देशभरातील तब्बल ५७१ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही भारताबाहेरील १४ शहरांमध्ये देखील ऑफलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करते. दुपारी २ ते ५.२० या वेळेत १३ भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर अनेक नियम आहे. हे नियम मुलांना पाळावे लागणार आहे. नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई देखील होई शकते. मुलांनी परीक्षा केंद्रावर कोणती काळजी घ्यावी या बाबतचे १० नियम आपण जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

यावर्षी NEET UG परीक्षेसाठी एकूण २३,८१, ८३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये १० लाखांहून अधिक मुळे आणि १३ लाखांहून अधिक मुलींचा समावेश आहे. याशिवाय २४ तृतीय पंथीय विद्यार्थ्यांनी देखील या साठी नोंदणी केली आहे. एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी १० लाखांहून अधिक ओबीसी, एनसीएल श्रेणीतील, ०६ लाख सामान्य श्रेणीतील, ३.५ लाख अनुसूचित जाती (एससी) श्रेणीतील, १.८ लाख हे सामान्य श्रेणीतील आणि १.५ लाख एसटी श्रेणीतील विद्यार्थी आहेत. नीटद्वारे देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS आणि इतर विविध पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला जातो. याशिवाय, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस (MNS) चे उमेदवार NEET UG परीक्षेच्या गुणांद्वारे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा रुग्णालयाच्या B.Sc नर्सिंग कोर्समध्ये देखील प्रवेश घेऊ शकतात.

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी असणारी नियमावली

१. नीट ड्रेस कोड : नीट परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलांनी हाफ स्लीव्ह शर्ट किंवा टी-शर्ट घालून जावे. साधी पँट घालून जावे. पँटमध्ये खिसे असू शकतात. अनेक साखळ्या आणि मोठी बटणे असलेले कपडे घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना शूज घालण्याची परवानगी नाही. त्यांना फक्त चप्पल किंवा सँडल घालण्याची परवानगी आहे. मुली कमी टाचांच्या सँडल घालून येऊ शकतात.

- दागिने घालून येण्यासही मनाई आहे. परीक्षेत सनग्लासेस, घड्याळ किंवा टोपी घालून बसण्याची परवानगी नाही. हेअरबँड, ताबीज, बेल्ट, स्कार्फ, अंगठ्या, बांगड्या, कानातल्या रिंग, नाकातील नथ, हार, बिल्ला, मनगटावर घड्याळ, बांगड्या, कानातले आदि धातूच्या वस्तू सोबत आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

२. कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र, स्वघोषणापत्र, फोटो आयडी प्रूफ, फ्रिस्किंगशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

३ . जर उमेदवारांनी सांस्कृतिक, पारंपारिक पोशाख, किंवा धर्माशी संबंधित गोष्टी परिधान केल्या असतील, तर त्यांना परीक्षा केंद्रावर तपासणीसाठी रिपोर्टिंग वेळेच्या किमान दीड तास आधी म्हणजे दुपारी १२.३० वाजेपर्यंत कळवावे लागणार आहे.

४. नीटमध्ये फक्त या गोष्टींना परवानगी आहे.

sharad pawar : त्यांनी स्वतःचं कुटुंब कुठं सांभाळलं? नरेंद्र मोदी यांच्या टीकेला शरद पवार यांचं सणसणीत प्रत्युत्तर

NEET प्रवेशपत्राव्यतिरिक्त, उमेदवारांनी मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणताही फोटो आयडी पुरावा सोबत आणावा. प्रवेशपत्रावर पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत न्यावे. प्रवेश पत्रकावर हे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र द्यावे लागणार आहे. फोटोच्या मागची बाजू ही पांढरी असावी. प्रवेशपत्रासह डाउनलोड केलेल्या फॉर्ममध्ये पोस्ट कार्ड आकाराचा हा फोटो लावावा. हे प्रवेश पत्र परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकाला द्यावे लागणार आहे.

जे उमेदवार प्रवेशपत्रासह डाउनलोड केलेल्या प्रोफॉर्मावर पेस्ट केलेले पोस्टकार्ड आकाराचे (4X6) छायाचित्र आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणणार नाहीत त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

उमेदवार एक पारदर्शक पाण्याची बाटली जवळ ठेऊ शकतात.

या सोबतच हँड सॅनिटायझरची ५० मिलीची बाटली देखील सोबत ठेऊ शकतात.

नीट प्रवेशपत्रासोबत स्वयंघोषणा फॉर्म आणि अंडरटेकिंग फॉर्म देखील आणावा लागेल. तो भरलेला असावा.

६. ही परीक्षा दुपारी २ वाजता सुरू होईल. प्रवेश फक्त अर्धा तास अगोदर म्हणजेच दुपारी १.३० पर्यंत दिला जाणार आहे. दुपारी १.३० नंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.

७. परीक्षा लिहिण्यासाठी फक्त निळा किंवा काळा बॉलपॉइंट पेन सोबत ठेवावा लागणार आहे.

८. या गोष्टी करण्यास मनाई : कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रांवर आणण्यास परवानगी दिली जाणार नाही. मोबाईल फोन, ब्लूटूथ, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, पेन्सिल बॉक्स, घड्याळे यांना परवानगी नाही. परीक्षा केंद्रावर कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही. तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये दागिने घालण्याची परवानगी दिली जाणार नाही.

९. यावर्षी देखील नीटचा पेपर ७२० गुणांचा असेल. एक प्रश्न चार गुणांचा असेल. निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या चार विषयांमध्ये विभाग अ मध्ये ३५ आणि विभाग ब मध्ये १५ प्रश्न असतील. १५ पैकी कोणतेही १० प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

१०. नीटचा निकाल १४ जून २०२४ रोजी जाहीर केला जाईल.

IPL_Entry_Point

विभाग