Air pollution Kids Deaths: 'स्टेट ऑफ ग्लोबल एअर'ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२१ मध्ये भारतात वायू प्रदूषणामुळे पाच वर्षांखालील सुमारे एक लाख ७० हजार मुलांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वायू प्रदूषणामुळे पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्युची नोंद दक्षिण आशिया आणि पूर्व, पश्चिम, मध्य आणि दक्षिण आफ्रिकेत जास्त आहेत.
लहान मुलांमधील वायू प्रदूषणाचा संपर्क न्यूमोनिया, जागतिक स्तरावर पाचपैकी एका मुलाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या श्वसनमार्गाच्या संसर्गाशी संबंधित आहे. दक्षिण आशियात पाच वर्षांखालील मुलांमध्ये वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दर एक लाख मुलांमागे १६४ आहे. तर, जागतिक सरासरी दर एक लाख मुलांमागे १०८ मृत्यू आहेत. २०२१ मध्ये भारतात १ लाख ६९ हजार ४०० बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर नायजेरिया (१ लाख १४ हजार १०० मृत्यू), पाकिस्तान (६८ हजार १००), इथिओपिया (३१ हजार १०० मृत्यू) आणि बांगलादेशमध्ये १९ हजार १०० मृत्यू झाला आहे. मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमध्ये अकाली जन्म, जन्माचे कमी वजन, दमा आणि फुफ्फुसाचे आजार यांचा समावेश आहे. कुपोषणानंतर या वयोगटासाठी दक्षिण आशियात मृत्यूचा दुसरा प्रमुख कारण आहे.
“मुले वायू प्रदूषणास असुरक्षित असतात आणि वायू प्रदूषणामुळे होणारे नुकसान गर्भाशयात सुरू होऊ शकते आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. फुफ्फुसे, शरीर आणि मेंदू विकसित होत असताना मुले शरीराच्या वजनाच्या प्रति किलो जास्त हवेत श्वास घेतात आणि प्रौढांच्या तुलनेत अधिक प्रदूषक शोषून घेतात”, असे अहवालात म्हटले आहे.
प्रत्येकी १ अब्जांहून अधिक लोकसंख्या असलेला भारत (२.१ दशलक्ष मृत्यू) आणि चीन (२.३ दशलक्ष मृत्यू) एकत्रितपणे एकूण जागतिक आजारांच्या ओझ्यापैकी ५४ टक्के आहेत. दक्षिण आशियातील पाकिस्तान (२ लाख ५६ हजार मृत्यू), म्यानमार (१ लाख ०१ हजार ६०० मृत्यू) आणि बांगलादेश (२ लाख ३६ हजार ३०० मृत्यू) यांचा समावेश आहे. एकंदरीत, २०२१ मध्ये वायू प्रदूषणामुळे मागील वर्षाच्या अंदाजापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत, हे दर्शविते की वायू प्रदूषणासंबंधित रोगांचे प्रमाण वाढत आहेत.
युनिसेफचे उपकार्यकारी संचालक किट्टी व्हॅन डेर हेजडेन यांनी सांगितले की, माता आणि बाल आरोग्यात प्रगती झाली असली तरी दररोज पाच वर्षांखालील सुमारे २००० मुले वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमुळे दगावतात. दरम्यान, २००० पासून पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण ५३ टक्क्यांनी घटले आहे, याचे मुख्य कारण स्वयंपाकासाठी स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता वाढविणे, तसेच आरोग्यसेवा, पोषण आणि घरगुती वायू प्रदूषणाच्या संपर्काशी संबंधित हानींबद्दल अधिक चांगली जागरूकता वाढविणे हे आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकेतील 'हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिटय़ूट' (एचईआय) या स्वतंत्र संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, २०२१ मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे एकूण ८१ लाख मृत्यू झाले. यामुळे आता वायू प्रदूषण हा जागतिक स्तरावर मृत्यूचा दुसरा सर्वात मोठा जोखीम घटक बनला आहे, ज्याचे प्रमाण कर्करोगाने मरण पावलेल्या मृत्युंच्या टक्केवारीपेक्षा जास्त आहे. वायू प्रदूषण दक्षिण आशियातील लहान मुलांच्या मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण ठरले. कुपोषणानंतर वायु प्रदुषणामुळे या वयोगटातील बालकांचा सर्वाधिक मृत्यू झाला.
ही आकडेवारी धक्कादायक असली तरी चिंताजनक नाही. अनेकदा मुले गर्भात असतानाच वायू प्रदूषणामुळे होणारे नुकसान सुरू होते. उदाहरणार्थ, दिल्लीत तीनपैकी एका मुलाला दमा आहे. वायू प्रदूषणामुळे मुलांमध्ये दोन समस्या उद्भवू शकतात. दमा जो असंसर्गजन्य आहे आणि दुसरा म्हणजे वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मुलांची फुफ्फुसे लहान असतात. परंतु ते वेगाने श्वास घेतात. ते वृद्धांप्रमाणेच अत्यंत असुरक्षित आहेत," असे पीएसआरआय इन्स्टिट्यूट ऑफ पल्मोनरी क्रिटिकल केअरचे अध्यक्ष आणि जागतिक वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील डब्ल्यूएचओ तज्ञ गटाचे सदस्य डॉ. जीसी खिलनानी यांनी सांगितले.
संबंधित बातम्या