Viral News : बकरी ईदला कुर्बानीपासून वाचवण्यासाठी ११ लाख रुपयांत खरेदी केले १२७ बकरे; आता करणार सेवा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : बकरी ईदला कुर्बानीपासून वाचवण्यासाठी ११ लाख रुपयांत खरेदी केले १२७ बकरे; आता करणार सेवा

Viral News : बकरी ईदला कुर्बानीपासून वाचवण्यासाठी ११ लाख रुपयांत खरेदी केले १२७ बकरे; आता करणार सेवा

Jun 18, 2024 10:58 AM IST

eid al adha : काही लोकांनी मिळून ११ लाख रुपये गोळा करून दिल्लीत १२७ बकऱ्यांचा बळी जाण्यापासून वाचवला. दिगंबर जैन लाल मंदिराशी संबंधित लोकांनी ही देणगी गोळा केली व बकरे खरेदी केले. आता त्याला शेळ्यांची देखभालीसाठी गोठ्यात पाठवण्यात येणार आहे.

बकरीदला कुर्बानीपासून वाचवण्यासाठी ११ लाख रुपयांत खरेदी केले १२७ बकरे; आता करणार सेवा
बकरीदला कुर्बानीपासून वाचवण्यासाठी ११ लाख रुपयांत खरेदी केले १२७ बकरे; आता करणार सेवा

127 goats saved by jain community in delhi : सोमवारी दिल्लीसह देशभरात बकरी ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार काही ठिकाणी बकऱ्यांचे बळी देखील दिल्या गेले. मात्र, दिल्लीत काही लोकांनी मिळून ११ लाख रुपये खर्च करून १२७ बकऱ्यांना बळी जाण्यापासून वाचवले. या बकऱ्यांची खरेदी तर केलीच पण त्यांची आयुष्यभर सेवा आणि देखभाल करण्याची देखील व्यवस्थाही करण्यात आली. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाले असून नेटकरी याचे कौतुक करत आहेत.

जुन्या दिल्लीतील धर्मपुरा जैन मंदिराशी संबंधित जैन समाजातील काही लोकांनी पुढाकार घेत हे पाऊल उचलले. दिगंबर जैन लाल मंदिराच्या व्यवस्थापनाशी संबंधित पुनीत जैन यांनी सांगितले की, मंदिराशी संबंधित तरुण जैन संघटनेने हे काम केले आहे. ते म्हणाले, 'प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. जसे सहकार्य मिळाले तसे आम्ही आमच्या क्षमतेनुसार या प्राण्यांचे रक्षण केले.

पुनीत जैन म्हणाले की, शेळ्यांची पूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यांना अन्न व पाणी दिले जात आहे. डॉक्टरांचे पथक सकाळ संध्याकाळ त्यांची तपासणी करत आहे. एक-दोन दिवसांत त्यांची रवानगी खतौलीजवळील जैन समाजाच्या शेळ्यांच्या गोठ्यात करण्यात येणार आहे.

क्राउड फंडिंगद्वारे उभा केला पैसा

बकरीदच्या दोन दिवस आधी मंदिराशी संबंधित काही लोकांच्या मनात हा विचार आला. यानंतर समाजातील लोकांना जोडणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ही योजना शेअर करून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. काही वेळातच ११ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. या रकमेतून १२७ शेळ्या खरेदी करण्यात आल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक शेळ्यांसोबत 'जगा आणि जगू द्या'चा नारा देताना दिसत आहेत. यामध्ये दिल्ली जैन समाजाचे अध्यक्ष चक्रेश जैन यांच्यासह अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अंकुर जैन आणि विवेक जैन यांच्या मेहनतीमुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे सांगितले.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर