इंग्रजी भाषेवरून हिणवणाऱ्या सुजय विखेंना नीलेश लंके यांचं खास स्टाइलनं उत्तर, व्हिडिओ पाहाच!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इंग्रजी भाषेवरून हिणवणाऱ्या सुजय विखेंना नीलेश लंके यांचं खास स्टाइलनं उत्तर, व्हिडिओ पाहाच!

इंग्रजी भाषेवरून हिणवणाऱ्या सुजय विखेंना नीलेश लंके यांचं खास स्टाइलनं उत्तर, व्हिडिओ पाहाच!

Jun 25, 2024 04:49 PM IST

Nilesh Lanke takes oath in english : सुजय विखे यांनी इंग्रजी भाषेवरून केलेल्या टीकेला शरद पवार यांच्या पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी थेट संसदेतून उत्तर दिलं आहे.

इंग्रजी भाषेवरून हिणवणाऱ्या सुजय विखेंना नीलेश लंके यांचं खास स्टाइलनं उत्तर, व्हिडिओ पाहाच!
इंग्रजी भाषेवरून हिणवणाऱ्या सुजय विखेंना नीलेश लंके यांचं खास स्टाइलनं उत्तर, व्हिडिओ पाहाच!

Nilesh Lanke takes oath in english : इंग्रजी येत नाही म्हणून जाहीर प्रचारात हिणवणारे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांना अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी जबरदस्त उत्तर दिलं आहे. नीलेश लंके यांनी आज लोकसभेत इंग्रजी भाषेतून संसद सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्या या हटके स्टाइलची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुजय विखे हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केला. नीलेश लंके यांच्या गावरान भाषणांमुळं ही निवडणूक प्रचंड गाजली होती.

लंके यांच्या याच गावरान भाषेवरून प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांनी प्रचारात त्यांना डिवचलं होतं. समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही. ते लोकसभेत जाऊन काय करणार आहेत, अशा शब्दांत विखे यांनी लंके यांची खिल्ली उडवली होती. लंके यांनी आपल्या भाषणातून त्यांना उत्तर दिलं होतं. इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे की काम करणारा खासदार पाहिजे, असा प्रश्न ते लोकांना करत होते. मात्र, विखे यांची ती टीका लंकेच्या मनाला लागली होती. त्यामुळंच खासदार झाल्यानंतर लंके यांनी थेट संसेदतूनच विखेंना उत्तर दिलं.

संसद भवनात सध्या नव्या खासदारांचा शपथविधी सुरू आहे. नीलेश लंके हे शपथ घेण्यासाठी पुढं आले आणि त्यांनी I Nilesh Dnyandeo Lanke असं म्हणत शपथ घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला महाराष्ट्रातील काही खासदारांनाही आश्चर्य वाटले, मात्र नंतर लंके यांच्या पवित्र्याचा अर्थ सर्वांना उलगडला. शपथेच्या शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हटल्यानंतर 'रामकृष्ण हरी' म्हणायला ते विसरले नाहीत.

काय म्हणाले होते सुजय विखे पाटील?

निवडणूक प्रचारादरम्यान एका कार्यक्रमात सुजय विखे हे लंके यांच्या इंग्रजी ज्ञानावर घसरले होते. ‘५० वर्षे माझ्या कुटुंबाला लोकांनी साथ दिली. माझा कुटुंब लोकांमुळंच राजकारणात काम करतंय. मी पत्रकार बांधवांना विनंती करतो, की त्यांनी माझी क्लीप माझ्या मित्राला पाठवावी. माझ्या इतकी इंग्रजी निलेश लंके यांनी बोलून दाखवावी, हवं, तर त्यांनी महिनाभर घोकमपट्टी करावी. माझ्या इतकी हिंदी आणि इंग्रजी माझ्या मित्रानं बोलली तर मी फॉर्म भरणार नाही,’ असं आव्हान त्यांनी लंके यांना दिलं होतं.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर