Naxalite Attack छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन उडवले, ९ जवान शहीद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Naxalite Attack छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन उडवले, ९ जवान शहीद

Naxalite Attack छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन उडवले, ९ जवान शहीद

Jan 06, 2025 04:17 PM IST

Chhattisgarh Naxalite Attack : छत्तीसगडमधून मोठी बातमी समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला असून या हल्ल्यात ९ जवान शहीद झाले आहेत. विजापूर जिल्ह्यातील बेद्रे-कुटरू रोडवर हा स्फोट झाला.

छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला
छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला (PTI/File)

Chhattisgarh Naxalite Attack : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या विजापूरमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांचे वाहन आयईडी स्फोट करून उडवले. या हल्ल्यात ड्रायव्हर आणि डीआरजीचे ८ जवान शहीद झाले होते. विजापूरमधील कुटरू रोडवरील बेद्रे येथे ही घटना घडली. शहीद जवान ऑपरेशन करून परतत होते ज्यात ५ नक्षलवादी ठार झाले आहेत.

बस्तरचे आयजी म्हणाले की, विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे गाडी उडवून दिली. यात डीआरजीचे ८ जवान आणि एका ड्रायव्हरसह ९ जणांचा मृत्यू झाला होता. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथील संयुक्त कारवाईतून ते परतत होते.

गाडीतील स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी पोलीस व्हॅनवर अंधाधूंद गोळीवारही केला. घटनास्थळी अजूनही चकमक सुरू असल्याचे सांगितले जात आगे. छत्तीसगडमध्ये प्रदीर्घ काळानंतर एवढी मोठी घटना घडवून आणण्यात माओवाद्यांना यश आले आहे. कुटरू रोडवरील बेदरा येथे नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनाला लक्ष्य केले.

बस्तरचे आयजी म्हणाले की, डीआरजी दंतेवाडाचे जवान दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरच्या संयुक्त कारवाईनंतर परतत होते. विजापूर जिल्ह्यातील बेद्रे-कुटरू रोडवर हा स्फोट झाला.

छत्तीसगडमधील बस्तर भागात शनिवारी सुरू झालेल्या कारवाईत आणखी एक मृतदेह सापडल्याने नक्षलवाद्यांचा मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील दक्षिण अबूझमाड येथील जंगलात शनिवारी सायंकाळी सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर गेले असताना चकमक झाली.

रविवारी सुरुवातीला चार नक्षलवादी मृतावस्थेत आढळले, तर नंतर आणखी एकाचा मृतदेह सापडला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या पाच वर पोहोचली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. चकमकीत जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) हेड कॉन्स्टेबल सन्नू करम शहीद झाले.

सोमवारी सकाळी या भागात शोधमोहीम सुरू होती. नारायणपूर, बस्तर, कोंडागाव आणि दंतेवाडा या चार जिल्ह्यांतील डीआरजी आणि स्पेशल टास्क फोर्सचे जवान शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सहभागी झाले होते. रायपूर विभागातील गरियाबंद जिल्ह्यात ३ जानेवारी रोजी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता.

गेल्या वर्षी राज्यात झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी २१९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

घातले होते.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर