Bijapur Naxal Encounter : छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर बीजापुर जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये तीव्र चकमक सुरू आहे. रविवारी सकाळपासून ही चकमक सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या कारवाईत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून २ जवान शहीद झाले आहेत त्याचबरोबर या कारवाईत २ जवान जखमी झाले आहेत.
नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले आहेत. डीआरजी आणि एसटीएफच्या कारवाईदरम्यान २ जवान शहीद झाले, तर २ जवान जखमी झाले आहेत. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे, ज्यात एवढ्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये अलीकडच्या काळात डझनभर माओवादी मारले गेले आहेत.
विजापूर-नारायणपूर सीमेजवळ ही चकमक झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक झाली ज्यात मोठ्या संख्येने नक्षलवादी ठार झाले. आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी सांगितले की, आतापर्यंत ३१ मृतदेह सापडले आहेत. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. या चकमकीत २ जवान शहीद झाले, तर २ जवान जखमी झाले. घटनास्थळावरून स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. रविवारी सकाळी झालेल्या या चकमकीत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांना घेरण्यात आले. ही चकमक अनेक तास चालली. सुरुवातीला १२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती होती, मात्र सर्च ऑपरेशननंतर जंगलात मृतदेह सापडले. एकूण ३१ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
गेल्या आठवड्यात छत्तीसगड-ओडिशा सीमेवर झालेल्या चकमकीत १६ माओवाद्यांना ठार करण्यात आले होते. यामध्ये ९० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या चलपतीचाही समावेश होता.
संबंधित बातम्या