मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  navy jawan new dress code: आता कुर्ता पायजाम्यात दिसणार नौदलाचे जवान; पारंपरिक पोशाक बनणार नवा ड्रेस

navy jawan new dress code: आता कुर्ता पायजाम्यात दिसणार नौदलाचे जवान; पारंपरिक पोशाक बनणार नवा ड्रेस

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 06, 2023 12:50 PM IST

navy jawan and officers will also be seen in kurta pajama: नौदलाचे जवान आणि अधिकाऱ्यांना आता नवा पारंपरिक ड्रेस मिळण्याची शक्यता आहे. हे अधिकारी आता कुर्ता आणि पायजाम्यात दिसणार आहेत.

indian navy officer traditional attire
indian navy officer traditional attire

indian navy officer traditional attire : नौदलात आता नवा आणि पारंपरिक ड्रेस कोड लागू केला जाण्याची शक्यता आहे. डायनिंग रूम आणि बोर्डरूममध्ये असतांना या पारंपरिक वेश जवान आणि अधिकारी परिधान करू शकणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

live in : धर्म वेगळा असला तरीही पालक मुलांना लिव्ह-इनमध्ये राहण्यास रोखू करू शकत नाहीत; उच्च न्यायालय

सध्या देशात इंडिया विरुद्ध भारत वाद जोरात सुरू आहे. G20 बैठकीसंदर्भात राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निमंत्रण पत्रात 'भारताचे राष्ट्रपती' असे लिहिल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार देशाचे नाव बदलणार आहे. विरोधकांनी त्यांच्या युतीचे नाव 'इंडिया' ठेवले असल्यामुळे घाबरून सरकार हे पाऊल उचलत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या वादात आता भारतीय नौदलाच्या सैनिकांना पारंपारिक भारतीय कपडे परिधान करण्याची परवानगी देण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी; नियंत्रण कक्षाला खळबळजनक मेसेज

नौदलाच्या तीन दिवसीय परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रीय नागरी पोशाखही प्रदर्शित करण्यात आला. हे कपडे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासमोर प्रदर्शित करण्यात आले ज्यात कुर्ता पायजमा, फॉर्मल वास्कट, चुरीदार पायजमा आणि गलबंड सूट यांचा समावेश होता. मात्र, या पोशाखांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. हा मुद्दा संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आला आहे.

ब्रिटीश काळापासून सैन्यात भारतीय पारंपरिक कपडे घालण्याची परवानगी जवान तसेच अधिकाऱ्यांना नाही. सैनिकांसोबत, भारतीय कपडे परिधान करून सैन्याच्या मेसमध्ये पाहुणे देखील प्रवेश करू शकत नव्हते. मात्र, पाश्चिमात्य संस्कृती दूर करण्याच्या विचारात नौदल आघाडीवर असल्याचे नव्या ड्रेस कोडच्या निर्णयावरून दिसते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले होते की, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून पंचप्राणचा उल्लेख केला. देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वतंत्र करण्याबाबत आग्रही असल्याचे मोदी म्हणाले होते.

पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या ध्वजावरून ब्रिटिश कालीन सेंट जॉर्ज क्रॉस काढून शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेल्या नव्या ध्वजाचे अनावरण केले होते. गेल्या वर्षी आयएनएस विक्रांतच्या अनावरण कार्यक्रमात नव ध्वज नौदलाला मिळाला होता. गेल्या महिन्यात नौदलात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. नौदल अधिकारी सामान्यत: एक दांडा बाळगत होते. आता हा दांडा बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. हा दांडा वसाहतवादी राजवटीचे गुलामगिरीचे प्रतिबिंब होते असे म्हटले होते.

WhatsApp channel

विभाग