Goa Crime News : सिलिंडरचा स्फोट घडवून बायको आणि सासूला उडवले, हुंड्यासाठी नौदल कर्मचाऱ्याचं हादरवून टाकणारं कृत्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Goa Crime News : सिलिंडरचा स्फोट घडवून बायको आणि सासूला उडवले, हुंड्यासाठी नौदल कर्मचाऱ्याचं हादरवून टाकणारं कृत्य

Goa Crime News : सिलिंडरचा स्फोट घडवून बायको आणि सासूला उडवले, हुंड्यासाठी नौदल कर्मचाऱ्याचं हादरवून टाकणारं कृत्य

Jan 06, 2024 02:13 PM IST

Navy Empolyee killed wife and Mother in Law : हुंड्यासाठी एक नौदल कर्मचाऱ्यानं स्वत:ची गर्भवती पत्नी व सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Goa Crime News
Goa Crime News

हुंड्यासाठी स्वत:ची गर्भवती पत्नी (२६) आणि सासूला गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून ठार केल्याच्या आरोपावरून गोवा पोलिसांनी एका नौदल कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अनुराग सिंग राजावत असं या आरोपीचं नाव आहे.

गोव्यातील वास्को द गामा बंदर शहरातील न्यू वडदेम इथली ही घटना आहे. मागच्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी घरात गॅस गळतीनंतर स्फोट होऊन शिवानी राजावत (२६) आणि तिची आई जयदेवी चौहान (५०) या दोघींचा मृत्यू झाला होता. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या होत्या. हा अपघात असल्याचं सुरुवातीला पोलिसांनाही वाटत होतं. मात्र, मृतांच्या घरच्यांनी पोलिसांना वेगळी माहिती दिली.

Sharad Mohol : मोहोळ खून कटात दोन नामांकित वकिलांचा सहभाग, सीसीटीव्ही फूटेज समोर

शिवानीच्या भावानं नंतर जिल्हा प्रशासनाकडं या प्रकरणी तक्रार दाखल केली. अनुराग सिंगनं २० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता. हा हुंडा मिळावा म्हणून तो शिवानी व आमचा छळ करत होता. त्यामुळं माझ्या बहिणीचा व आईचा मृत्यू हा अपघात नसून घातपात आहे असं शिवानीच्या भावाचं म्हणणं होतं.

जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेत गोवा पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करण्याचे आदेश दिले होते. तपासात हा खून असल्याचं समोर आलं. पोलिसांनी अनुराग सिंग राजावत यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) तसेच हुंडाबळी छळवणुकीखाली गुन्हा दाखल केला आहे, तर त्याच्या कुटुंबीयांना हुंड्यासाठी छळ केल्याच्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे. हे कुटुंब मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचं असून वास्को द गामा इथं भाड्याच्या जागेत राहत होतं.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर